एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठची केतकी कदम जिल्ह्यात पहिली तर वेदांत राऊत दुसरा.
Satara News Team
- Thu 1st Sep 2022 10:27 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्ह्यात नवनवीन उपक्रमात नावारुपाला आलेली संस्था म्हणजे शिक्षण प्रसारक संस्था त्याच संस्थेचे श्रीपतराव पाटील हायस्कूल, करंजे हे एक उपक्रमशील विद्यालय.त्याच विद्यालयातील ३२ विद्यार्थी एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसले होते त्यातील आठ विद्यार्थी जिल्ह्याच्या मेरिट लिस्ट मध्ये आले. त्यांचा गुणगौरव सोहळा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार, सचिव तुषार पाटील,स्कूल कमिटी चेअरमन वत्सलाताई डूबल,संचलिका हेमकांची यादव,प्रतिभा चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र फडतरे आणि पर्यवेक्षक अमर वसावे आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.दीपप्रज्वलन व सरस्वती पुजनानंतर एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा जिल्ह्यातून प्रथम आलेल्या केतकी कदम, तर द्वितीय आलेला वेदांत राऊत आणि यशस्वी विद्यार्थ्यांमधून अनीषा नाळे,नीलम झोरे या विद्यार्थ्यांची मनोगते झाली तर त्यांचेबरोबर पार्थ खामकर,हर्षदा पलंगे,शुभम डगळे,दिशांत मडावी या यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.संस्थाप्रमुखांच्या वतीने स्कूलकमिटी चेअरमन वत्सलाताई डूबल यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे तसेच संस्थेच्या व शाळेच्या यशाचे अभ्यासपूर्ण नियोजन करणारे संस्थेचे कार्यक्षम सचिव तुषार पाटील यांचेही तोंडभरुन कौतुक केले.त्यांचे नंतर संस्था संचालिका सौ.प्रतिभा चव्हाण यांचेही मार्गदर्शन झाले त्यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांबरोबर कन्याशाळा राजपथ सातारा येथील गीत गायन स्पर्धेत दुसरा नंबर मिळविल्याने विद्यालयाच्या वाद्यवृंदातील यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शिका सौ.वृषाली व वैशाली कुंभार यांचाही सन्मान केला तर श्रीपतराव पाटील विद्यालय आपल्या संस्थेच्या सचिवांच्या मार्गदर्शनात तसेच मा.मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या पर्यवेक्षणात अद्वितीय कामगिरी करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि सर्व शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन आपल्या मनोगताची सांगता केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एम.एम.एस स्पर्धा परीक्षेचे प्रमुख के.के.वाईकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र फडतरे यांनी मानले आणि गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता झाली..
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 1st Sep 2022 10:27 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 1st Sep 2022 10:27 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 1st Sep 2022 10:27 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 1st Sep 2022 10:27 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 1st Sep 2022 10:27 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 1st Sep 2022 10:27 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Thu 1st Sep 2022 10:27 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 1st Sep 2022 10:27 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 1st Sep 2022 10:27 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Thu 1st Sep 2022 10:27 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Thu 1st Sep 2022 10:27 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 1st Sep 2022 10:27 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Thu 1st Sep 2022 10:27 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Thu 1st Sep 2022 10:27 am











