वर्णेच्या काळभैरवनाथ केसरी बैलगाडी आखाड्यात राजधानी एक्सप्रेस बलमा गाडी ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी
Satara News Team
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : वर्णे येथे श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या बैलगाडी आखाड्यात गोडोलीच्या अक्षय शिवाजी मोरे यांची राजधानी एक्सप्रेस बलमा ही गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तिला एक लाखाचे रोख बक्षीस, या आखाड्यात द्वितीय क्रमांकाचे मानकरी भैरवनाथ प्रसन्न गडकर आळी (सातारा ) ही गाडी ठरली असून तिला साठ हजाराचे रोख बक्षीस, तृतीय क्रमांकाचे चाळीस हजाराचे बक्षीस दत्ता शिंदे पाटखळ यांनी मिळवले तर चतुर्थ क्रमांकाचे तीस हजाराचे बक्षीस वर्णे येथील रणजित पवार यांच्या
बैलगाडीने मिळवले असून, पाचव्या क्रमांकाचे पंचवीस हजाराचे बक्षीस वर्णे येथील माजी सरपंच विजय पवार यांच्या बैलगाडीने मिळवले असून, सहाव्या क्रमांकाचे पंधरा हजारांचे बक्षीस पुसेगावच्याआम्रपाली बाळासाहेब शिंदे यांच्या बैलगाडीने मिळवले असून, बक्षीस विजेत्या प्रत्येक गाडीला दोन मानाच्या ढाली मिळाल्या आहेत.
सदरच्या आखाड्याचे नियोजन वर्णे
येथील आ. शशिकांत शिंदे
मित्रसमूहाने केले होते. या आखाड्यात आ. शशिकांत शिंदे मित्र समूह, अमर बळीराम पवार, विकास साहेबराव पवार, सुनिल तुकाराम काकडे, अविनाश विलास पवार, धैर्यशील देवबा पवार,अंगापूरचे ऋषीराज कणसे, गौरव कणसे, प्रफुल्ल कणसे, खेडचे कामेश कांबळे, सातारा येथील टॉप गिअर
ट्रान्समिशनचे कार्यकारी संचालक श्रीकांत पवार, वर्णे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक राजेंद्र पवार, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर दयानंद चव्हाण, अपशिंगेच्या
प्राची ट्रेडर्सच्या शिवराज रानभरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ धनंजय रानभरे यांच्याकडून, वर्णेच्या बाजी ग्रुपकडून रोख बक्षिसांचे
प्रायोजकत्व स्वीकारले होते. मानाचा ढाली श्री काळभैरवनाथ कॅस्ट्रशन वर्णे व तळेकर अर्थमूव्हर्स यांच्याकडून मिळाल्या होत्या. या आखाड्याचे थेट प्रक्षेपण सरपंच ऍग्रो वर्णे आणि शिवराज ग्रुप महामुलकरवाडी यांनी केले होते. थेट प्रक्षेपणामुळे गाडीचा क्रमांक ठरवणे एकदम सोपे जात होते.
हा आखाडा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आ. शशिकांत शिंदे
मित्रसमूहाने परिश्रम घेतले तर समालोचक म्हणून पेडगावचे सुनिल मोरे यांनी काम पाहिले तर झेंडा पंच बापू धनावडे यांनी काम केले. या आखाड्यात १५० बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. या आखाड्याला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते, खाद्य पदार्थांच्या स्टॉलची गर्दी होती. अशा आखाड्यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्थेला चालना मिळत असून देशी गोवंश वाचवण्याचे मोलाचे काम होत आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Tue 4th Apr 2023 08:16 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Tue 4th Apr 2023 08:16 pm











