सातारा शहरातील शाळां-महाविद्यालयांतील इ.१० वी व १२ वीमधील सर्व प्रवर्गातील सुमारे शंभर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ रविवारी दि.२० रोजी

सातारा  : संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे व सातारा जिल्हा अधीक्षक (कृषी अधिकारी) भाग्यश्री फरांदे यांच्या हस्ते सातारा शहरातील शाळां-महाविद्यालयांतील इ.१० वी व १२ वीमधील सर्व प्रवर्गातील सुमारे शंभर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ रविवारी दि.२० रोजी रोजी सकाळी ११ वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हाॅलमध्ये होणार आहे.
                       विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील उज्वल वाटचालीसाठी करिअरच्या संधीबाबत मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या अकरा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.अशी माहीती अध्यक्ष दिनकर झिंब्रे व उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली.
यावर्षी, गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय संविधान तसेच गैरसमजाच्या प्रदेशात हे पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.तेव्हा सदरच्या समारंभास उपस्थित रहावे.असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने  कार्यवाह ॲड.हौसेराव धुमाळ यांनी केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला