खटाव येथे महिला आर्थिक विकास बचत गट यांच्या विद्यमाने हळदी कुंकू व महिला आरोग्य शिबिर कार्यक्रम
निसार शिकलगार
- Fri 20th Jan 2023 11:18 am
- बातमी शेयर करा

पुसेगाव : महिला आर्थिक विकास बचत गट यांच्या विद्यमाने खटाव येथील इंदिरा नगर परिसरात मकरसंक्रांतीचे औचित्य साधून हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला.अनोख्या पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सहभागी झालेल्या महिलांना वाण म्हणून आरोग्याच्या दृष्टीने हित हितकारक ठरेल असे शिबीर आयोजित करण्यात आल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
ग्रामपंचायत खटावचे सरपंच नंदकुमार वायदंडे, प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद भंडारे,अस्मिता सिएमआरसी व्यवस्थापक सीमा पुजारी, सहयोगिनी कोमल फडतरे व सिआरपी रेश्मा शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अनोखा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. डॉ. मिलिंद भंडारे यांनी उपस्थित महिलांना मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन व संस्थात्मक प्रसुती,ई-कार्ड,आभा कार्डचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. याशिवाय खटाव प्राथमिक आरोग्य विभागाच्या वतीने उपस्थित महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. सीमा पुजारी यांनी ठराविक वयात महिलांना उद्भवणाऱ्या समस्या व त्यावर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी विशेष पध्दतीने तिरंगा इंद्रधनुष्य थाळी तयार करण्यात आली. या निमित्ताने महिलांना फळे, भाज्या अन्नधान्य यांचे आहारातील महत्त्व व पोषण मूल्यांबाबत अवगत करण्यात आले.याशिवाय पाककला स्पर्धेचे विशेष आयोजन करण्यात आले होते.मान्यवरांनी पाककलेचे परीक्षण करून पोषण आहार बक्षिसांचे विजेत्या महिलांना वितरण करून सन्मानित करण्यात आले. शिबिरात बचत गटाच्या विविध वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.आरोग्य विभागाच्या नयन भातडे,अक्षया भिलारे ,वाय.डी.भोसले व आशा स्वयंसेविका रोहिणी झिरपे यांनी विशेष श्रम घेतले. सीआरपी रेश्मा शेख यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थित बचत गटातील महिलांचे आभार मानले.अनोख्या पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
खटाव:मकरसंक्रांतीनिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित अस्मिता लोकसंचलीत साधन केंद्र वडूज यांच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न झाले.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Fri 20th Jan 2023 11:18 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Fri 20th Jan 2023 11:18 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Fri 20th Jan 2023 11:18 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Fri 20th Jan 2023 11:18 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Fri 20th Jan 2023 11:18 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Fri 20th Jan 2023 11:18 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 20th Jan 2023 11:18 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 20th Jan 2023 11:18 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 20th Jan 2023 11:18 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 20th Jan 2023 11:18 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 20th Jan 2023 11:18 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 20th Jan 2023 11:18 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 20th Jan 2023 11:18 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 20th Jan 2023 11:18 am