भुईज येथील घटना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरी करतानाच चोरटे रंगेहात पकडले.
बापू वाघ- Wed 24th Aug 2022 09:28 am
- बातमी शेयर करा
भुईंज ; मंगळवार दिनांक २३ ऑगष्ट रोजी मध्यरात्री तीन वाजता बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता.
याबाबत घटनास्थळ व भुईंज पोलीसांनी दिलेली माहिती अशी की भुईंज विजयनगर येथील शंकर यदु जाधव यांच्या वंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर भांडयांचा आवाज आल्याने शेजारीच राहणारे जागे झाले. आणि त्यांनी बाहेर येवून पाहणी केली असता बंद घरात कोणीतरी असल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूला राहणारे इतर ग्रामस्थांना बोलावून बंद घराच्या मागेपुढे कड्या लावून पोलीसांना फोन केला. याच दरम्यान रात्र गस्तीवर असणारे भुईंज पोलीसांचे पथक त्याठिकाणी पोहचल्यानंतर त्यांनी कड्या काढुन आतील दोन अज्ञात इसमांना ताब्यात घेतले.
दरम्यान ताब्यात घेतल्यानंतर भुईंज पोलीसांनी सदर इसमांची चौकशी केली असता महेश शिवाजी भोसले रा. तुळजापूर रोड तुळजापूर जि. सोलापूर व दुसरा इसम ईरशाद हरून मुल्ला रा. वाठार गाव राम मंदीराजवळ ता 1. कोरेगाव जि. सातारा यांनी चोरीचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलीसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकारानंतर मंगळवार सकाळ पासून विजयनगर भुईज परिसर एस टी. स्टॅण्ड परिसर याठिकाणी या पकडलेल्या चोरांच्याविषयी जोरदार चर्चा सुरू होती. तर ऐन सणासुदीच्या कालावधीत या चो-यांच्या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरलेले आहे. यासाठी भुईंज पोलीसांनी एस टी स्टॉण्ड परिसरात मदत केंद्र व गेली एक बर्षे बंद पडलेले सीसीटिव्ही कॉमेरे व ध्वनीक्षेपक यंत्रणा सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांतमधुन होत आहे.
१. तंटामुक्त कमिटीचे माजी अध्यक्ष व पोलीस हवालदार यांच्या सतर्कतेचे कौतुक
चोरटयांना पकडण्यासाठी मदतकार्य करणा-या ग्रामस्थांमध्ये विजयनगर येथे राहणारे व मेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस हवालदार संभाजीराव बाबर व भुईजच्या तंटामुक्ती कमिटीचे माजी अध्यक्ष प्रभाकर भोसले यांनी आपल्या अनुभवाचे कसव लावत चोरटयांना जेरबंद करत पोलीसांना विशेष सहकार्य केले. यांच्या कामाचे परिसरात कौतुक होत आहे..
२. भुईंज पोलीसांनी महामार्गावर कार्यक्षेत्र मोठे व आपुरी कर्मचारी संख्या टीम सक्षम पण बंद पडलेली गाडी यामुळे त्यांच्यावर आवाका असून सुद्धा मर्यादा आहेत. तरी सुद्धा सपोनि आशिष कांवळे यांनी यावावत ग्रामस्थांचे आभार व्यक्त करत रात्र गस्त सुरू करा असे आवाहन केले आहे
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 24th Aug 2022 09:28 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 24th Aug 2022 09:28 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 24th Aug 2022 09:28 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 24th Aug 2022 09:28 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 24th Aug 2022 09:28 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Wed 24th Aug 2022 09:28 am
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 24th Aug 2022 09:28 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Wed 24th Aug 2022 09:28 am
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Wed 24th Aug 2022 09:28 am
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Wed 24th Aug 2022 09:28 am
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Wed 24th Aug 2022 09:28 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Wed 24th Aug 2022 09:28 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Wed 24th Aug 2022 09:28 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Wed 24th Aug 2022 09:28 am












