शेखर गोरे प्रतिष्ठाणचा टॅंकर म्हसवडकरांच्या सेवेत दाखल
शेखर गोरे प्रतिष्ठाणचा टॅंकर म्हसवडकरांच्या सेवेत दाखलधिरेनकुमार भोसले
- Fri 24th May 2024 12:23 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी : म्हसवड शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असुन या पाणी टंचाईमुळे नागरीकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. शहरातील ही पाणी टंचाई दुर करण्यास पालिका प्रशासन कमी पडत असल्याने पाण्यासाठी महिलावर्गाचे पालिकेवर मोर्चे निघत आहेत. ही बाब जेव्हा शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे माण - खटावचे नेते शेखर गोरे यांना समजली तेव्हा त्यांनी जराही वेळ न दवडता स्वखर्चातुन म्हसवडकरांना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले, तर यापुढे जोवर येथील पाणी टंचाई दुर होत नाही तोवर दररोज दोन टँकरद्वारे पिण्याचे पाणी म्हसवडकरांसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्धार केला आहे.
म्हसवड शहराला पालिकेकडुन होणार्या पाणी पुरवठ्यामध्ये घोटाळा झाल्याचे सांगितले जात आहे, तर यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे, याचा थेट परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होवुन शहरवासीयांना १५ दिवसांतुन एकवेळ पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. सध्या पालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरु असुन पालिका प्रशासन पाण्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप नागरीकांतुन व्यक्त होत आहे. तर शहरात निर्माण झालेली पाणी टंचाई ही पालिकेच्या केवळ ढिसाळ नियोजनामुळे होत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.
शहरात पिण्याचे पाणी हे १५ दिवसांतुन येत असल्याने आम्ही जगायचे कसे म्हणत गत तीन दिवसांपुर्वी येथील नाभिक गल्लीतील संतप्त महिलांनी पालिकेसमोर ठिय्या मांडत मनख्याधिकार्यांना घेराव घालत याबाबतचा जाब विचारला होता तेव्हा पालिका प्रशासनाने खडबडुन जागे होत नाभिक गल्लीमध्ये त्याच दिवशी पाणी पुरवठा केला. त्याचे पदसाद शहरातील इतर भागात चांगलेच उमटल्याचे दिसुन आले पालिका प्रशासन जर आंदोलन केल्यावर पाणी सोडत असेल तर मग आम्हीही आंदोलन करु अशी चर्चा शहरातील गल्लोगल्ली सुरु झाल्याने यावर खबरदारी म्हणुन पालिकेने शहरात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु केले आहेत, मात्र या पाण्यात खुप घाण व पाण्याला उग्र वास येत असल्याचे नागरीकांतुन सांगितले जात आहे. तर शहरात उद्भवलेल्या पाणी टंचाई कडे आता जिल्हाधिकार्यांनीच लक्ष द्यावे अशी मागणी म्हसवडमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी करीत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले त्यामुळे पाणी प्रश्न सुटणार की अधिक जटिल होणार असा प्रश्न सर्वासमोर उभा ठाकला असतानाच नेहमीच सामान्यांच्या हाकेला धावुन जाणार्या शेखर गोरे यांना ही बाब समजली अन् त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपण आपल्या टँकरने म्हसवडकरांना स्वखर्चाने पाणी उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला अन् स्वच्छ पाण्याने भरलेले दोन टँकर म्हसवडरांसाठी पाठवुनही दिले. या टँकरचा शुभारंभ येथील रिंगावण पेठ याठिकाणी करण्यात आला, यावेळी राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रा. विश्वंभर बाबर, , दाऊद मुल्ला,प्रमोद लोखंडे आदी उपस्थित होते.
"शेखर गोरे यांनी दाखवलेले हे दातृत्व पाहुन म्हसवडकर जनता शेखर गोरे हे एखाद्या देवदुताप्रमाणे आपल्या मदतीला धावुन आले असल्याचे म्हणत आहे. तर मागेल त्या ठिकाणी टँकर उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे शेखर गोरे यांनी सांगत फक्त एक फोन करा अन् टँकर मागवा असे आवाहनही केले आहे."
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 24th May 2024 12:23 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 24th May 2024 12:23 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 24th May 2024 12:23 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 24th May 2024 12:23 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 24th May 2024 12:23 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 24th May 2024 12:23 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Fri 24th May 2024 12:23 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 24th May 2024 12:23 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 24th May 2024 12:23 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 24th May 2024 12:23 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 24th May 2024 12:23 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 24th May 2024 12:23 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 24th May 2024 12:23 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 24th May 2024 12:23 pm











