अपशिंगे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

देशमुखनगर :-संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अपशिंगे मिलिटरी या ठिकाणी काही उपक्रम आणि कार्यक्रम आणि संकल्प बांधून साजरा करण्यात आला. मूळ रहिवासी वाटेगाव तालुका वाळवा येथील श्री एम बी राजमाने कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती कराड यांनी अपशिंगे गावास 75 ध्वजा गोरगरिबांना वाटप केले. साधारण गेले चार-पाच वर्ष त्यांनी मिलिटरी बॉईज होस्टेल कराड येथे 15 ऑगस्ट व 26 जानेवारी चे अवचित्य साधून अन्नदान केले आहे. आर्मी डे च्या प्रत्येक वर्षी कराड विभागातील शहिदांच्या घरी जाऊन भेटवस्तू देणे त्यांच्या कुटुंबांच्या अडीअडचणी दूर करणे हा त्यांचा सुट्टीच्या दिवशी चा उपक्रम आहे. त्यांनी वाटेगाव तालुका वाळवा येथील शहीद जवान जहांगीर पठाण यांच्या कुटुंबाला स्वतःचे एक महिन्याचे वेतन माननीय इंद्रजीत देशमुख यांचे हस्ते मदत स्वरूपात दिले, लॉकडाऊन च्या काळात याच गावातील गरजू आणि गरीब चार कुटुंबांचे पालकत्व हाती घेऊन त्यांना अन्नधान्य आणि औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली. कराड शहर पोलीस ट्राफिक चे 4 पॉईंटवरील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना काळात रोज तीन वेळेचा चहा व आरोग्यदायी काढा जवळजवळ तीन महिने स्वखर्चाने स्वतः तयार करून पोलिसांना पुरविला. आज त्यांनी अपशिंगे मिलिटरी या गावात सदिच्छा भेट देऊन गावातील गोरगरिबांना तिरंगी ध्वज भेट स्वरूपामध्ये दान केला. या त्यांच्या उपक्रमास आणि त्यांच्या उर्वरित जीवनात अपशिंगे ग्रामस्थांच्या वतीने श्री जयवंत जयसिंग निकम यांचे हस्ते सत्कार घेऊन शुभेच्छा दिल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला