टिपर चोरीस गेल्याचा बनाव करून इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळवण्याचा कट करणारी टोळी जेरबंद

1 एसएटीए 31 : जेरबंद केलेल्या तीन संशयितासमवेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक

सातारा ; टिपर चोरीस गेल्याचा बनाव करून इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळवण्याचा कट करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पदकाला यश आले. यश अरुण इनामदार (रा. सोमवार पेठ, कराड), विजय कदम, संतोष साळुंखे (दोघेही रा. नागठाणे, ता. सातारा), नेताजी निंबाळकर (रा. मांडकी, ता. माळशिरस) अशी जेरबंद केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून 3 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम व टिपर हस्तगत करण्यात आला.  
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.22 जुलै 2022 रोजी रात्री 10.30 ते दि.23 जुलै रोजी 8.30 वाजण्याच्या दरम्यान नागठाणे येथून टिपर (क्रमांक एम.एच.11 एएल 5780) चोरीला गेल्याची तक्रार विजय रामचंद्र कदम (रा. नागठाणे, ता. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या होत्या. त्यानुसार किशोर धुमाळ यांनी एक विशेष पथक तयार केले. तपास करीत असताना यश अरुण इनामदार याने हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले, विजय कदम यांचा टिपर (क्रमांक एम.एच.11 एएल 5780) चे कर्जाचे हप्ते थकले होते. कदम यांना पैशाची गरज असल्याने त्याकरता टिपर चोरीला गेला असल्याचे दाखवून त्याचा इन्शुरन्स मंजूर करून घेऊन पैसे मिळवायचे. त्यानंतर तो टिपर कदम यांच्या ओळखीचे नेताजी निंबाळकर यांच्या ताब्यात द्यायचा असे ठरले. त्या टिपरचा क्रमांक एम.एच.12 एचडी 5216 असा बदलून तो वापरायचा. गिऱहाईक मिळाल्यानंतर पेपरची विक्री करायची व मिळालेले पैसे वाटून घ्यायचे असा कट डंपर मालक विजय कदम त्यांचे मित्र संतोष साळुंखे, नेताजी निंबाळकर यांनी केला होता. ठरलेल्या कटाप्रमाणे विजय कदम तसेच संतोष साळुंखे यांच्या सांगण्यावरून डंपर चोरी केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर विजय कदम व संतोष साळुंखे यांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे मान्य केले. इन्शुरन्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी चोरीचा बनाव करून लपवून ठेवलेले 3 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम व टिपर हस्तगत करण्यात आला.  
कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तमराव दबडे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, संतोष पवार, अतिश घाडगे, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव यांनी सहभाग घेतला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त