शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खेड, ता. सातारा येथून आ. महेश शिंदे व शिवभक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात काढली दुचाकीवरून भव्य रॅली
विजय माने - Sat 3rd Jun 2023 12:36 pm
- बातमी शेयर करा
खेड : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खेड, ता. सातारा भागातून आ. महेश शिंदे व शिवभक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात दुचाकीवरून भव्य रॅली काढली. यावेळी संपूर्ण परिसर शिवमय झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे सुरू होत आहेत. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी खेड भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आ. महेश शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.त्या समोर ढोल- ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजी सुरू होती.

यावेळी खेड भागातून आ. महेश शिंदे यांनी काढलेली दुचाकी रॅली. भगवे फेटे, टोप्या परिधान करून व हाती भगवे झेंडे घेऊन दुचाकीवरून आ. महेश शिंदे व शिवभक्तांनी बॉम्बे रेस्टॉरंट, खेड, वाढे
चौकमार्गे खेड गावठाण, प्रतापसिंहनगर, विकासनगर, संगम माहुली, संगमनगर, गुरुदत्त कॉलनी, वनवासवाडी या भागातून भव्य रॅली काढली. यावेळी ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जयघोष करण्यात आला. त्यावेळी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील नटराज मंदिर येथे रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीत खेडच्या सरपंच लता फरांदे, कांतिलाल कांबळे, सुधीर काकडे, विजय माने ,विनोद माने, गणेश पालखे, शरद शेलार, शामराव कोळपे, स्वप्निल बोराटे, सुमित माने,अशोक फरांदे, सुशांत देशपांडे, श्रीधर शिंदे, मयूर गंगणे, संजय गायकवाड, संदीप चव्हाण यांच्यासह महिला, युवती, युवक व आ. महेश शिंदे विचारमंचचे कार्यकर्ते, शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
#shivrajebhishek
#maheshshinde
#shivbhakt
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 3rd Jun 2023 12:36 pm











