नाशिक येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्र,वाई च्या विद्यार्थ्यांना नेत्रदीपक यश..


मार्शल आर्ट्स' म्हणजे युद्धकला किंवा लढाईचे तंत्र! स्वसंरक्षण करणे आणि इतरांचे रक्षण करणे, हा या कलेच्या उदयामागील हेतू आहे. या कलेत प्रचंड एकाग्रता, धैर्य, कौशल्य आणि चपळता पहावयास मिळते. तायक्वांदो, जुसुत्सु, जुडो, विंग चुन, कराटे, कुंग फू हे मार्शल आर्ट्सचे काही साहसी प्रकार आहेत. युरोप आणि आशिया खंडात या कलेविषयी प्रचंड आकर्षण आहे. देशभरात आता मार्शल आर्टस् शिकण्याकडे तरुणाईचा वाढता कल दिसून येतोय.
३२ वी महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर/ कॅडेट/ ज्युनिअर क्योरुगी तायक्वांदो  स्पर्धा नाशिक येथे सम्पन्न झाली.या स्पर्धेमध्ये 
ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्र वाई तालुका मधील विद्यार्थ्यांनी उज्वल असे यश संपादन केले.
कु. गार्गी संतोष किरवे रौप्य पदकाची मानकरी ठरली 
व कु. तनिष्का प्रशांत थोरवे हिला कांस्यपदक प्राप्त झाले. तर कु. तनिष्का संतोष किरवे
कु. नयन नारायण जगताप  यांनी सुद्धा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक  म्हणून विशाल कुमठे सर काम पाहत आहेत. वाई, महाबळेश्वर व भोर तालुक्यात ते या खेळाचे क्लासेस घेत आहेत. यापुढील काळात   
तायक्वांदो या खेळामध्ये  वाई मधील खेळाडू  देशासाठी पदक आणतील असा विश्वास प्रशिक्षक विशाल कुमठे सर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.  या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ओमकार कांबळे सर, स्वप्निल पवार सर, धिरज गायकवाड सर यांचे लाभले. या अभूतपूर्व यशाबद्दल  सर्वच स्तरातून ब्लॅक ड्रॅगन  मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्र वाई तालुका  यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला