डी जी कॉलेज एनसीसी कॅडेट साक्षी साळुंखेची ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प दिल्ली येथे निवड

सातारा : सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय व 22 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा ची कॅडेट साक्षी साळुंखे हिची दिल्ली येथे ११ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत संपन्न होणाऱ्या ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प या राष्ट्रीय स्तरावरील कॅम्पसाठी निवड झाली आहे. या शिबिरात निवडीसाठी मागील तीन महिन्यापासून साक्षी साळुंखे कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेडकॉटर येथे संपन्न झालेल्या विविध कॅम्पान मधून कठोर परिश्रम घेऊन  याटप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे. 
एनसीसी थल सैनिक कॅम्प च्या निवडीसाठी विद्यार्थ्यांमधील युद्ध कौशल्य, युद्धातील डावपेच, फील्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट, मॅप रीडिंग, ऑबस्टीकल ट्रेनिंग फायरिंग इत्यादी कौशल्य तपासले जातात व या कौशल्याच्या आधारावर विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील कॅम साठी निवड होत असते. या कॅम्पच्या माध्यमातून कॅडेट साक्षी साळुंखे दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॅा. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे तसेच डी.जी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, उपप्राचार्य डॅा. व्ही.के. सीवंत कंपनी कमांडर लेफ्टनंट डॉ. राजशेखर निलोलू यांनी अभिनंदन केले आहे. 22 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा चे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. एम. ठोंगे, प्रशासकीय अधिकारी कर्नल व्ही. एम. भालसिंग, सुभेदार मेजर तपासे, सर्व रॅंक यांनी छात्रास शिबिराच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले आहे. बटालियनचे सर्व अधिकारी व एन सी सी सिविल स्टाफ कडून तिचे कौतुक होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला