प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी एमआयडीसीच्या रस्त्यावर टाकला कचरा
कचऱ्याच्या समस्येला कंटाळलेल्या शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन : वाहतुकीला प्रचंड अडथळाSatara News Team
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
- बातमी शेयर करा
सातारा, : एमआयडीसीकडे जाणाऱ्या देगाव रस्त्यावर चंदननगरनजिक मंगळवारी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग लागले होते. वाहनधारकांना हा कचरा रस्त्यावर कसा हे कळत नव्हते. त्या कचऱ्यातूनच वाट काढण्याची कसरत करत वाहने ये जा करत होती. मात्र हा कचरा रस्त्यावर कसा आला याचे कारण निराळेच होते. शेतकऱ्यांच्या शेतालगत कचरा फेकून जाणाऱ्यांना व कचऱ्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोडोली ग्रामपंचायतीला धडा शिकवण्यासाठी परिसरातील कचऱ्या समस्येने हैराण झालेल्या शेतकऱ्यांनीच शेतालगत हॉटेलवाले, नागरिकांनी टाकलेला कचरा थेट रस्त्यावर टाकला होता. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. आता तरी कोडोली ग्रामपंचायतीचे डोळे उघडणार का ? हे पहावे लागणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी, देगावरोड एमआयडीसी वरच्या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या चंदननगर येथील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या शेत आणि मोकळ्या जागेत गेले कित्येक दिवस कोडोलीच्या उपनगरातून येणारे जाणारे लोक तसेच छोटे मोठे हॉटेल व्यवसायिक, चिकन शॉप मधील शिल्लक राहिलेला तसेच खरकटे असलेला घाण कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या भरून रात्रीच्या अंधारात पुलाच्या जवळ असणाऱ्या शेतालगतच्या मोकळ्या जागेत बेमालूमपणे फेकला जात होता. त्यातून त्या ठिकाणी भटकी कुत्री, कचऱ्याचे ढिगच्या ढीग आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. हा कचरा रस्त्यालगत असणाऱ्या उभ्या पिकांमध्ये येऊन स्थानिक शेतकऱ्यांना नाहक त्रास होत होता. कचऱ्यावर भटकी कुत्री फिरत असताना त्यांच्यात कळवंडी होऊन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचे अपघात होण्याची शक्यता होती. हे कळून ही कचरा टाकणारांचे प्रमाण कमी न होता ते वाढतच होते.
याबाबत कर्मवीरनगरमधील आनंदराव पवार यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट या साऱ्याचा उलगडा करुन गेली. कचरा शेतकऱ्यांच्या शेतालगत टाकला जातो. शेतकऱ्यांना त्रास होतो व सर्वांनाच त्रास होतो. हा कचरा शहराच्या प्रत्येक उपनगरात असलेल्या मोकळ्या जागेत टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याला जबाबदार उपनगरातील स्थानिक रहिवाशी की प्रशासन आहे हे कळायला मार्ग नाही. याला जबाबदार रहिवाशांचा बेजबाबदारपणातून निर्माण झालेला आळशीपणा म्हणायचा की ग्रामपंचायतच्या घंटा गाड्या ? ज्या कधी वेळेमध्ये कचरा गोळा करायला येत नाहीत ? असे प्रश्न विचारत टाकलेली पोस्ट समस्येचा उलगडा करुन गेली. या पोस्टमध्ये अनेक नागरिकांनी कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दोषी धरले आहे तर ग्रामपंचायतीने कचरा उचलण्याबाबत दक्ष राहिले पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दरम्यान, आज कोडोली चंदननगर येथील या कचऱ्याचा ज्या स्थानिक शेतकऱ्यांना नाहक त्रास होत होता, त्यांनी हा कचरा स्वतःच्या हाताने मुख्य रस्त्यावर टाकून येणारे जाणारे वाहन धारक आणि संबंधित प्रशासनाला जाग यावी म्हणून हे पाऊल उचलले आहे.
आता तरी संबंधितांना याची जाग यावी. आणि या कचऱ्याच्या संदर्भात ठोस उपाययोजना राबवावी. असे वाटते, अशी भावना आनंदराव रामचंद्र पवार. कर्मवीर नगर यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केली असून कोडोली उपनगरातील या कचरा समस्येवर आता तरी मार्ग निघणार का हे काही दिवसात समोर येईल अन्यथा शेतकरी आणखीन तीव्र आंदोलन करणार आहेत.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Tue 22nd Aug 2023 07:38 pm











