पालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई करत बाजारपेठेतून १० किलो प्लास्टिक जप्त करून करून ९४०० रुपये दंड वसूल केला.

पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या प्लास्टिकला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी पांचगणी गिरिस्थान नगरपालिकेचे पथक ॲक्शन मोडमध्ये आले असून शासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक बंदी विरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आ

पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या प्लास्टिकला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी पांचगणी गिरिस्थान नगरपालिकेचे पथक ॲक्शन मोडमध्ये आले असून शासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक बंदी विरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे.पालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई करत बाजारपेठेतून १० किलो प्लास्टिक जप्त करून करून ९४०० रुपये दंड वसूल केला. 
 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड उपप्रादेशिक अधिकारी एल एस भड व क्षेत्र अधिकारी रेखा तोंबरे यांचे आदेशानुसार पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता दिग्विजय गाढवे ,आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे व कर्मचारी व यांच्यामार्फत सिंगल युज प्लाॅस्टिक बॅन बाबत शहरात कारवाई करण्यात आली. 
शहरातील बाजारपेठेतील दुकानाची तपासणी करण्यात आली, यामध्ये ज्यांनी सिंगल युज प्लास्टिक बाबत उल्लंघन केले आहे.  त्यांच्याकडून रुपये 9400 इतका दंड वसूल करण्यात आला. या कारवाई मध्ये एकूण  १० किलो नॉन ओवन बॅग व सिंगल युज प्लाॅस्टिक जमा करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घातली असून, सिंगल यूज प्लास्टिक वापर रोखण्यासाठी व्यापक जनजागृती सुरू आहे. सिंगल यूज प्लास्टिक साठवणूक, विक्री होत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश असल्याने ही कारवाई केली असल्याची माहिती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली. नागरिक व व्यापाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टिक विक्री व वापर करणे टाळावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला