वाठार स्टेशन गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.अभय तावरे यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

 वाठार: वाठार स्टेशन गट हा प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील संवेदनशील जिल्हा परिषद गट म्हणून मानला जातो यातच कायम या गटात राष्ट्रवादीची सत्ता असून हा गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो परंतु वाठार स्टेशन गटात कायम विकासासाठी अग्रेसर राहून काम करणारे जिल्हा परिषद सदस्य म्हणून डॉ.अभय तावरे यांच्याकडे पाहिले जाते.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शिर्डी येथे मेळावा असून या मेळाव्यासाठी वाठार स्टेशन गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित न राहता थेट त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून शिंदे गटात जाहीर रित्या प्रवेश केला या प्रवेशासाठी सातारा जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाल्याचे चित्र दिसून आले आता मात्र डॉ.अभय तावरे यांच्या स्वरूपात राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यात मोठे खिंडार पडल्याचे दिसत आहे व आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणनीतीची ही सुरुवात झाली असून डॉ. अभय तावरे यांचा जाहीर प्रवेश याचेच द्योतक ठरत आहे.

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला