उघडा कचरा व डबक्यांनमुळे साताऱ्यात डासांचा उच्छाद धुर फवारणीची मागणी

Due to open garbage and puddles, mosquitoes are rampant in Satara, demand for smoke spraying
तर काहींनी मच्छरदाणीचा वापर सुरू केला आहे. यापुढे आणखी भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी औषध फवारणी करावी. तसेच, वेळोवेळी धूर फवारणी करावी. डास उत्पत्ती केंद्र असलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, ​अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. "खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यासह ड्रेनेजच्या सांडपाण्यात गटारामध्ये औषध फवारणी करण्यात यावी. रस्त्यावर पडलेला पाळापाचोळा कचरा कुजल्यानेही डासांचे प्रमाण वाढत आहे. अशा कचऱ्याचा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावा.

सातारा : सातारा रहिवासी भागांसह विविध भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये  पावसाचे पाणी साचून डबके  तयार झाले आहेत. शिवाय पाण्याने बऱ्याच ठिकाणी कचरा कुजल्याने डासांची  पैदास वाढली आहे.त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. औषध आणि धूर फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.गेल्या काही दिवसापासून शहरात सतत सुरू असलेल्याने ठीक ठिकाणी पाणी साचत आहे यात पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून डबके तयार झाले आहेत. असे हे डबके आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यासाठी निमंत्रण देत आहे. साचलेले पाणी आणि विविध ठिकाणी पडून असलेला कचरा यावर पावसाचे पाणी पडून कचरा कुजला आहे असे दोन्ही ठिकाण डास मच्छर उत्पत्तीचे केंद्र ठरत आहे. डासांमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक लहान- मोठे क्लिनिक, रुग्णालय सध्या रुग्णांनी हाउसफुल असल्याचे दिसून येत आहे.प्रामुख्यने साताऱयातील कारंजे मल्हारपेठ बुधवार नका या ठिकाणी प्रतेक घरात एक पेशंट आहे नगरपालिका मूग गिळून गप्प बसली आहें कोठेही फवारणी दिसत नाही पावडर मारलेली दिसत नाही या मुळे या ठिकाणी नगरपालिका फक्त घरपट्टी वसुली साठी आहें का हा प्रश्न नागरिक उपस्तिथ करत आहेंत नगरपालिका कर्मचारी येतंय पण काम करतात का फक्त दिवस भरून जातात हे संबधीत्यांनी लक्ष ठेवणायची गरज आहें इतकेच नाही तर कुजलेल्या कचऱ्यामुळे डासांचे प्रमाण तर वाढलेच आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रहिवाशांना यामुळे आरोग्याचा त्रास जाणवत आहे. डासांपासून बचावासाठी पावसाळी गारट्याच्या वातावरणातही नागरिकांना पंखा लावण्याची वेळ आली आहे.तर काहींनी मच्छरदाणीचा वापर सुरू केला आहे. यापुढे आणखी भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी औषध फवारणी करावी. तसेच, वेळोवेळी धूर फवारणी करावी. डास उत्पत्ती केंद्र असलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, ​अशी मागणी नागरिकांकडून होत आहे."खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यासह ड्रेनेजच्या सांडपाण्यात गटारामध्ये औषध फवारणी करण्यात यावी. रस्त्यावर पडलेला पाळापाचोळा कचरा कुजल्यानेही डासांचे प्रमाण वाढत आहे. अशा कचऱ्याचा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावा

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला