आले व्यापाऱ्यांनो सावधान शेतीमालाचे आल्याचे नवे जुने वर्गीकरण करू नका, अन्यथा अनुज्ञप्ती रद्द होईल!
निसार शिकलगार - Mon 12th Sep 2022 06:49 am
- बातमी शेयर करा
पुसेगाव : यावर्षी आले व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याचे आले खरेदी करताना नवे जुने असे भाग पाडले जाऊन व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबवण्याची मागणी भारतीय किसान संघाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष यांनी सातारा शेती उत्पन्न बाजार समितीकडे दिनांक २/९/२२ रोजी केली होती. त्यास अनुसरून बाजार समितीने आले व्यापाऱ्यांनी नवे जुने आल्याचा वर्गीकरण दराचा पाडलेला भाग थांबवावा अन्यथा आपली व्यापारी लायसन्स बंद करण्याची नोटीसाद्वारे ताकीद दिली आहे.

भारतीय किसान संघ यांनी सातारा बाजारात समितीकडे दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, सातारा तालुक्यासह सर्व जिल्ह्यातील आले व्यापाऱ्यांनी आले खरेदी करताना नवा व जुना असे मालाचे वर्गीकरण करण्याची प्रथा चालू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असून, त्यामुळे आले पिकासाठी केलेला उत्पादनाचा खर्च सुद्धा निघत नाही, आपण शेतीमाल आले खरेदी करताना आलेमाल नवा किंवा जुना असे वर्गीकरण करू नये,त्या मालाची प्रत पाहून त्याचा योग्य दर करून खरेदी करावा, कारण यापूर्वी जुना नवा असा कोणताही नियम प्रचलित नव्हता व नाही. तरी माल खरेदी बाबत योग्य ती काळजी घ्यावी. याबाबत बाजार समिती कडे अशा प्रकारची कुठलीही शेतकऱ्यांची तक्रार आल्यास आपले अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल असा इशारा सातारा बाजार समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 12th Sep 2022 06:49 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 12th Sep 2022 06:49 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 12th Sep 2022 06:49 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 12th Sep 2022 06:49 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 12th Sep 2022 06:49 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 12th Sep 2022 06:49 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Mon 12th Sep 2022 06:49 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 12th Sep 2022 06:49 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 12th Sep 2022 06:49 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Mon 12th Sep 2022 06:49 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Mon 12th Sep 2022 06:49 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 12th Sep 2022 06:49 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Mon 12th Sep 2022 06:49 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Mon 12th Sep 2022 06:49 am











