दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावं : आ. शिवेंद्रसिंहराजे

विविध शाळांच्या विद्यार्थ्यांना रेनकोट, गणवेश वाटप

सातारा : दुर्गम भागात शेती आणि व्यवसायासाठी अनेक अडचणी येत असतात. दुर्गम भागातील लोकांचे जीवनमान उंचवायचे असेल तर या भागातील मुले उच्चशिक्षित झाली पाहिजेत. दुर्गम आणि डोंगरी भागातील विध्यार्थ्यानी शिक्षणाला प्राधान्य देऊन स्वतःचे आणि गावाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 
                  आदर्श माध्यमिक विद्यालय, पेटेश्वरनगर येथे विविध शाळातील विध्यार्थ्यांना आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वतीने दीडशे रेनकोट आणि प्रभो शिवाजी राजा प्रतिष्ठान व कास पठार विकास प्रतिष्ठानच्या वतीने शंभर गणवेश वाटप समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोडके, आष्टे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र गायकवाड,  पेट्री जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख सातपुते, पंचायत समितीचे माजी सदस्य अजय काशीद, संपत जाधव, सामाजिक कार्यकर्ते गोविंद बादापुरे, रामचंद्र उंबरकर, अरुण शेडगे, अंकुश मोरे, शंकर जांभळे, श्रीरंग आहिरे, पांडुरंग शेडगे, महादेव अहिरे, सखाराम शिंदे, एल. डी. गोगावले, मुख्याध्यापक साखरे, विविध गावचे सरपंच, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. 
              प्रभो शिवाजीराजा प्रतिष्ठानच्या आणि कास पठार विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांबरवाडी, यवतेश्वर, आनावळे, जांभळमुरे, अनावळेवाडी, पिसानी, पेट्री बंगला, पेट्री गाव, अंबानी, पारंबे, अटाळी, कासानी, घाटवन, एकीव  या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वरनगर पेटवली बंगला या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना आ. शिवेंद्रसिंहराजे  यांच्या कुटुंबियांच्या वतीने दीडशे रेनकोट देण्यात आले. तसेच प्रतिष्ठानच्यावतीने शंभर गणवेश वाटप करण्यात आले. स्वतःसाठी तर सगळे जगतात. थोडं दुसऱ्यासाठी जगा या उक्तीप्रमाणे जी मंडळी  कास पठार भागातील शाळेत शिकली त्यानंतर आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबईला स्थायिक झाली पण, कर्मभूमी मुंबई असली तरी आपली मायभूमी आणि सामाजिक जबाबदारी विसरली नाहीत. आपण ज्या ठिकाणी लहानाचं मोठं झालो, ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आदी शालेय साहित्याचे वाटप  होत आहे. प्रतिष्टान आणि येथील ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जोपासली असून ती आणखी वृद्धिंगत व्हावी, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले. सोमनाथ जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर लक्ष्मण गोगावले यांनी आभार मानले

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला