लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश
कोमल वाघ-पवार
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
- बातमी शेयर करा

सातारा : अरुणाचल प्रदेश ( इरानगर ) येथे झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा 9 ते 14 जुलै 2023 रोजी पार पडल्या या स्पर्धा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील दोन खेळाडू सैफअली झारी व श्रीराज शिंदे यांची महाराष्ट्रातून निवड झाली होती त्यामध्ये सैफअली याला ब्रांझ मेडल व श्रीराज शिंदे याने राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. हे दोन्ही खेळाडू 11 वी सायन्स मध्ये शिकत आहेत. या दोन्ही खेळाडूंचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर व्ही शेजवळ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व आय. क्यू. एस. प्रतिनिधी श्री अविनाश कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सैफअली झारी व श्रीराज शिंदे यांना आंतरराष्ट्रीय कोच सागर जगताप यांनी प्रशिक्षण दिले आहे. महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख प्रा. मेजर मोहन विरकर, प्रा. डॉ विकास जाधव, प्रा शिरीष ननावरे यांचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून प्रत्येक गटात 25 खेळाडू सहभागी झाले होते. सत्कार प्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ अशोक तंवर, सौ वर्षा शिंदे प्रा सुनील शिंदे व सर्व प्राध्यापक व खेळाडूंचे आई शाहीन आणि वडील साजिद हजर होते या खेळाडूंना प्राचार्य डॉ आर. व्ही. शेजवळ व प्राध्यापकांनी कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या या उत्तुंग यशासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.अभयकुमार साळुंखे, सचिव मा.सौ. शुभांगी गावडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 20th Jul 2023 02:15 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 20th Jul 2023 02:15 pm