वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
बघणाऱ्या नागरिकांची त्यांच्यावर कौतुकाची थाप
सुनिल साबळे- Sun 21st Jul 2024 07:01 pm
- बातमी शेयर करा
शिवथर : सातारा येथील राधिका रोडवर कायमच वाहनांची वर्दळ असते त्यातच सकाळच्या वेळी मोठा ट्रक अचानक बंद पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला त्यावेळी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी नागेश खापे निलेश निकम व नगरपालिकेचे कर्मचारी पवार आणि कदम यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत बंद पडलेला ट्रक स्वतः ढकलून बाजूला काढला आणि वाहतूक सुरळीत केली हे बघणाऱ्या नागरिकांनी वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या वर कौतुकाची थाप टाकली
राधिका रोडवर कायमच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे नागरिकांना येणे जाणे अवघड होत असते त्यामध्ये जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर फार मोठा बाका प्रसंग निर्माण होतो. परंतु खऱ्या अर्थाने पोलीस कर्मचारी नागेश खापे आणि निलेश निकम नोकरी बजावत असताना जर अशा पद्धतीने सहकार्य करत असतील तर कोणतीही अडचण निर्माण होऊ शकणार नाही यांनी जे सामाजिक काम केलेले आहे याच पद्धतीने सर्वच वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच नागरिकांनी सहकार्याची भावना दाखवली तर कोणताही प्रसंग असला तरी तो निभावून जाऊ शकतो
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 21st Jul 2024 07:01 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 21st Jul 2024 07:01 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sun 21st Jul 2024 07:01 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 21st Jul 2024 07:01 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sun 21st Jul 2024 07:01 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sun 21st Jul 2024 07:01 pm





