लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून 250 रुपयांचा दुसरा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या बँकखाती वर्ग.

सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याला गळीतास पुरविलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा.

सातारा न्यूज दौलतनगर दि.02 :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2021-22 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना एफआरपीचीच्या पहिल्या हप्ता ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर यापुर्वीच वर्ग केली असून एफआरपीचा प्रतिटन 250 रुपयेप्रमाणे होणारा दुसरा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे  कार्यकारी संचालक सुहास देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2021-22 चे गळीत हंगामामध्ये 02 लाख 66 हजार 488 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.82% सरासरी साखर उताऱ्यांने 03 लाख 15 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सन 2021-22 च्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील गाळपास आलेल्या ऊसाला एफआरपीच्याप्रमाणे पहिला हप्ता ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे बँक खाती यापुर्वीच अदा केला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे  मार्गदर्शक व पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने आर्थिक नियोजन करत दैनंदिन खर्चांमध्ये काटकसर करण्याचे धोरण राबविले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवा नेते यशराज देसाई व कारखाना व्यवस्थापनाने सन 2021-22 च्या गळीत हंगामात कारखान्याला गळीतास आलेल्या ऊसाला एफआरपीच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतिटन 250 रुपये इतकी रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खाती वर्ग केली असल्याचे सांगत सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याला गळीतास पुरविलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा. तसेच येणाऱ्या गळीत हंगाम यशस्वी करण्याच्या उद्देशाने कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपल्या संपूर्ण ऊसाच्या नोंदी कारखान्याचे संबंधित विभागीय कार्यालयामध्ये कराव्यात, असे आवाहन  कार्यकारी संचालक सुहास देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला