फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.

फलटण.: फलटण शहरात सर्व सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे आणि महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि सदैव पवार साहेबांच्या बद्दल आदर व्यक्त करणारे माननीय नंदकुमार जी मोरे यांचे आज सकाळी सात वाजता हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. 

आणि फलटण शहरात  सर्वत्र शोक कळा पसरली. 17 जुलै रोजी आलेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सर्वत्र असणाऱ्या विविध मंडळाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन युवकांना प्रबोधन पण केले होते. सर्व सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. अंत्यविधी आज दुपारनंतर वैकुंठ स्मशानभूमी फलटण येथे होणार आहे. 

माननीय नंदकुमार जी मोरे हे नेहमीच सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात आणि समाजाची जडणघडण सामाजिक सलोखा राजकीय सलोखा एकत्र राखण्याचा नेहमीच प्रयत्न करत होते. प्रत्येक विषयातील त्यांची सातत्यता आणि सखोल अभ्यास, सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, पाहता फलटण शहरांमध्ये शोक कळा पसरली आहे. शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये असणारा त्यांचा मित्रपरिवार प्रचंड संख्येने फलटण शहरात एकत्र येऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे.

सातारा न्यूज च्या टीमशी सदैव आत्मीयतेने आणि संलग्न असणारे व्यक्तिमत्व या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला सातारा न्यूज टीमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला