काही लोकांना सत्तेची सुज आली आहे ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत रामराजेंच नाव न घेता आ.जयकुमार गोरे यांचा घणाघात
Om Sonavle
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm
- बातमी शेयर करा
सातारा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सातारा जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर आज भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार जयकुमार गोरे यांना माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता सत्ता नसली काही लोकांची अवस्था पाण्याविना मासा जसा तडफतो तशी होते. त्यांच्या प्रवेशाबाबत मला काही कल्पना नाही. मात्र जर आलेच तर तेव्हा पाहू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. रामराजे नाईक निंबाळकर हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. सातारा जिल्ह्यातील राजकारण ते शरद पवार यांच्या पंखाखाली राहून करत आहेत. या कालावधीत त्यांनी आमदारकीसह विधान परिषदेचे अध्यक्ष अशी पदेही भूषवली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात शिवसेना बंडखोर व भाजप युतीचे सरकार आले आहे. त्यातच रामराजे निंबाळकर यांचे जावई राहूल नार्वेकर हे भाजपमध्ये असून ते विधान परिषदेचे अध्यक्षही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कालपासून रामराजे नाईक निंबाळकर देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार जयकुमार गोरे आज साताऱ्यात आले असताना पत्रकारांनी त्यांना त्यांचे कट्टर राजकीय विरोधक रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याबाबत छेडले. त्यावेळी आमदार गोरे यांनी प्रथम याबाबत मला काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया नोंदवली. त्यानंतर देखील माध्यम प्रतिनिधींनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. तेव्हा आमदार गोरे म्हणाले, जिल्ह्यातील काही लोकांची अवस्था अशी आहे की जर सत्ता नसेल तर त्यांची अवस्था पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जशी होते तशी झालेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील राजकारण, सहकारात सत्ता भोगून देखील त्यांच्या इच्छा अपूर्णच आहेत. कदाचित त्यामुळे ते भाजपमध्ये येत असतील. पण मला याबाबत काही माहिती नाही. तसे काही असेल तर भाजपमधील वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, मी एक छोटा माणूस आहे. रामराजे आणि आपला राजकीय संघर्ष उभ्या राज्याला माहिती आहे. जर रामराजे भाजपमध्ये आले तर आपली भूमिका काय असेल, असे विचारले असता आमदार जयकुमार गोरे म्हणाले, त्यांनी जरा सत्ता नसताना कार्य करुन दाखवण्याची गरज आहे. सत्ता नसते तेव्हा काय होते याचा अनुभव त्यांना आला पाहिजे. त्यांच्याकडेच जिल्ह्यातील सत्ता होती. सत्ता नसताना राजकारणात कसे जिंकायचे, सत्ता नसताना समाजकारण कसे करायचे हे करुन दाखवले तर तर त्यांना मानू. भाजपमध्ये आले तर तेव्हाचे तेव्हा बघूया. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. जेव्हा येतील तेव्हा माझी भूमिका मी स्पष्ट करेन, असे आमदार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सातारा जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर आज भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार जयकुमार गोरे यांना माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता सत्ता नसली काही लोकांची अवस्था पाण्याविना मासा जसा तडफतो तशी होते. त्यांच्या प्रवेशाबाबत मला काही कल्पना नाही. मात्र जर आलेच तर तेव्हा पाहू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
JaykumarGore
ramrajenaiknibhalkar
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Fri 22nd Jul 2022 12:48 pm












