औंध पोलीस ठाण्याकडून अवैधरीत्या वाळुची वाहतुक करणाऱ्यास अटक करुन सुमारे १०,६०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात
आशपाक बागवान
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
- बातमी शेयर करा
औंध : औंध पोलीस ठाणे हद्दीत मौजे पुसेसावळी ता. खटाव गावचे हद्दीत दत्तचौक येथे आरोपी रमेश नारायण जाधव वय-२३ वर्षे, रा. गुरसाळे, ता. खटाव, जि.सातारा याने आपले ताब्यातील अशोक लेलॅंड कपनीचा १६१६ मॉडेलचा पिवळ्या रंगाचा डंपर, वाहन क्रमांक एम. एच ५० ३३६६ असा असलेला व चेसी नंबर MB1GDYC7BEMG4716 मधुन बेकायदा बिगरपरवाना अवैधरित्या ६०,०००/- रुपये किंमतीची सुमारे ४ (चार) ब्रास वाळुची चोरटी वाहतुक करीत असताना मिळुन आला आहे. म्हणून वगैरे मजकूरचे खबरीवरुन औंध पोलीस ठाणे गु.र.नं. १५७/२०२३ भा.दं.वि.सं. कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असून सदर गुन्ह्यातील आरोपी रमेश नारायण जाधव, वय २३ वर्षे, रा.गुरसाळे, ता.खटाव, जि.सातारा यास अटक करुन सुमारे १०,६०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक सातारा श्री. समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक, श्री. बापू बांगर, मा.अश्वीनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प वडूज यांचे मार्गदर्शनाखाली औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पी. दराडे, आर.पी.कांबळे, पो. हवा. १६५९, आर एस बनसोडे पो.ना.ब.नं. २४३, किरण एन हिरवे, पो.कॉ.ब. नं.५१०, एम.आर.जाधव, पो.कॉ. ब.नं.२०१७ यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे श्री.समीर शेख पोलीस अधिक्षक सो, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सो. सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 20th Jun 2023 01:06 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 20th Jun 2023 01:06 pm













