अभिनेते किरण माने यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश
Satara News Team
- Sun 7th Jan 2024 03:00 pm
- बातमी शेयर करा
मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर जाहीरपणे रोखठोक भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या या सोहळ्याला सुषमा अंधारे, सुनील प्रभू यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी किरण माने आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांशी संवादही साधला. किरण माने यांनी 'जय महाराष्ट्र' म्हणत संवाद साधायला सुरुवात केली. त्यावेळी समोरून शिवसैनिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद आला नाही. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी स्वत: पुढाकार घेत, 'अरे म्हणा की जय महाराष्ट्र', असे सांगितले. त्यावर शिवसैनिक एका सुरात 'जय महाराष्ट्र'उद्गारले आणि पुढील भाषणाला सुरुवात झाली.
किरण माने यांनी यावेळी शिवसेना (ठाकरे गट) पक्षात प्रवेश करण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. मी एका सर्वसामान्य घरातील व्यक्ती आहे. मी परिवर्तनाच्या चळवळीत होतो आणि राहील. मी संविधान वाचवण्यासाठी लढत आहे. आज राज्यातील आणि देशातील वातावरण गढूळ झाले आहे. भारतीय संविधान धोक्यात आहे, अशावेळी त्याविरोधात लढणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे हाच आहे. त्यामुळे या लढाईत त्यांच्या पाठिशी उभं राहणं महत्त्वाचं आहे. अनेकांना मी अचानक राजकीय भूमिका कशी काय घेतली, याचं आश्चर्य वाटेल. मात्र, मी पूर्ण विचार करुन हा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांची वैचारिक नाळ ही प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी जोडली गेली आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आल्यास प्रजेचे हाल कुत्रं खाणार नाही, असे प्रबोधनकारांनी लिहून ठेवले आहे. आज तशीच काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक सजग नागरिक म्हणून आपण सक्रियपणे राजकारणात उतरले पाहिजे, असे मला वाटले. त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्ष देईल ती जबाबदारी मी मनापासून पार पाडेन, असे किरण माने यांनी म्हटले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी किरण माने यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश दिला. किरण माने हे राजकीय हेतूने नव्हे तर चाललेलं पाहवत नाही म्हणून शिवसेना पक्षात आले आहेत. मी तुम्हाला एवढंच वचन देतो की, तुम्ही शिवसेनेत आलात, याचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 7th Jan 2024 03:00 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 7th Jan 2024 03:00 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 7th Jan 2024 03:00 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 7th Jan 2024 03:00 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 7th Jan 2024 03:00 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Sun 7th Jan 2024 03:00 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 7th Jan 2024 03:00 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Sun 7th Jan 2024 03:00 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Sun 7th Jan 2024 03:00 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Sun 7th Jan 2024 03:00 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Sun 7th Jan 2024 03:00 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sun 7th Jan 2024 03:00 pm












