छ.शाहु महाराज यांचा राजधानीत पूर्णाकृती पुतळा उभारला जाईल : छ.खा.उदयनराजे भोसले
प्रकाश शिंदे - Fri 16th Dec 2022 11:20 am
- बातमी शेयर करा
सातारा : २१ व्या शतकात प्रगती होत आहे.मात्र, महापुरुष यांच्या बद्दल अपशब्द बोलले जात आहे. त्यामुळे पक्ष,जात आदींमध्ये भेद निर्माण होत आहेत.तेव्हा त्यांचे विचारांचा जागर पसरविण्यासाठी ठिकठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत.शिवाय,छ.शाहु महाराजानी साताऱ्यात केलेल्या कार्याची दखल घेऊन शहरात पूर्णाकृती भव्य दिव्य असा पुतळा उभारला जाईल.असे आश्वासन श्रीमंत छ.खा.उदयनराजे भोसले यांनी दिले.
सातारा नगरीचे संस्थापक छ. शाहु महाराज यांचा स्मृतिदिन येथील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये संपन्न झाला.तेव्हा छ.खा.भोसले मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले,"थोरांनी दिलेल्या विचारावरच लोकशाही टिकली आहे.त्यांनी दिलेल्या विशालदृष्टीकोणातूनच सर्वधर्मसमभाव राखला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी दिलेल्या सर्वधर्मसमभाव ही संकल्पना रुजविण्यासाठी सर्वानी एक होणे गरजेचे आहे.असाही पुनरुच्चार करीत त्यांनी विरोधी विचारधारेवर चौफेर टीका केली. कोण्हीही स्वार्थ न पाहता प्रत्येक कुटुंबाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल.हेही प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पाहिले पाहिजे.
प्रमुख संयोजक इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी प्रास्ताविकपर माहिती कथन केली.यावेळी डॉ.धनाजी मासाळ व आदिनाथ बिराजे यांनीही मनोगत व्यक्त केली.सदरच्या कार्यक्रमास रणजित देशमुख,राजेंद्र शेलार,डॉ.सुरेश जाधव,नरेंद्र पवार,कॉ.किरण माने,सुनील काटकर,प्रा.दशरथ सगरे,अमर गायकवाड,ऍड.दत्ता बनकर,सौ.सुजाताराजे महाडिक,सादिक शेख,चंदुशेठ जाधव,अरबाज शेख,जोतिराम वाघ,सुनील भोसले,उमेश चव्हाण,भूषण पाटील,विक्रम कदम,प्रवीण धस्के,शिरीष चिटणीस आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार व कार्यकर्ते उपस्थित होते. याकामी, महात्मा ज्योतिराव फुले इतिहास अकादमी,गिरी प्रेमी ग्रुप व राष्ट्रसेवा समुह यांनी संयोजन केले.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 16th Dec 2022 11:20 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 16th Dec 2022 11:20 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 16th Dec 2022 11:20 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 16th Dec 2022 11:20 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 16th Dec 2022 11:20 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 16th Dec 2022 11:20 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 16th Dec 2022 11:20 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 16th Dec 2022 11:20 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 16th Dec 2022 11:20 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 16th Dec 2022 11:20 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 16th Dec 2022 11:20 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 16th Dec 2022 11:20 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 16th Dec 2022 11:20 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 16th Dec 2022 11:20 am













