आबापूरी-वर्णे मंदिरात भौतिक सुविधा वाढवा - परमेश्वर बाबर

यात्रा व वर्षभर येणाऱ्या भाविकांच्या मूलभूत गरजा भागाव्यात

देशमुखनगर : यात्रा व वर्षभर श्री काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता त्यांना मूलभूत व भौतिक सुविधा देण्यावर जास्तीत जास्त भर दिला गेला पाहिजे, असे मत मंत्रालयातील ग्रामविकास विभागाचे अवर सचिव परमेश्वर बाबर यांनी येथे व्यक्त केले.
  नुकत्याच पार पडलेल्या आबापूरी-वर्णे (ता.सातारा) येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथांच्या यात्रेस भेटी प्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील मोठ्या यात्रा व मोठ्या देवस्थांनांपैकी एक असणाऱ्या या देवस्थानाला शासनाचा तीर्थक्षेत्राचा "ब" वर्ग दर्जा प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने यापुढे लाखोंचा शासकीय निधी उपलब्ध होण्याची प्रक्रिया सूरू झाली असून या निधीच्या माध्यमातून भविष्यात सुसज्ज व सर्व सोयी सुविधायुक्त भक्तनिवास होणे गरजेचे आहे. तसेच अधिकच्या भौतिक सुविधा या ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणे क्रमप्राप्त आहे. यामध्ये रस्ते, पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठी भरपूर व शुध्द पिण्याचे पाणी, अद्ययावत स्वयंपाकगृह, स्वच्छतागृहे, स्नानगृहे उभारण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
  दरम्यान ट्रस्टने स्वनिधी विकसीत करून केलेल्या विविध विकासकामांबद्दल त्यांनी कौतुक केले. तसेच येत्या काळात या निधीत वाढ करून गावातील विविध विकासकामांवर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सूचीत केले.
  याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी अनिल शिंदे, देवस्थानचे शिवकळा अधिकारी प्रकाश कुलकर्णी, मुंबई स्थित उद्योजक अमर पवार, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रविण पवार, सरपंच रमेश पवार, देवस्थानचे मुख्य मानकरी विनायक महाजन, माजी पंचायत समिती सदस्य प्रविण धस्के, सर्व विश्वस्त, ग्रामपंचात सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



फोटो कॅप्शन : आबापूरी-वर्णे (ता.सातारा) :- देवस्थान भेटीप्रसंगी परमेश्वर बाबर यांचे स्वागत करताना प्रकाश कुलकर्णी व इतर.
आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला