महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार आता छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये

नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत नव्या जागेची पाहणी

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरातील एल. सी. डिसोजा रोडवर अनेक वर्षांपासून भरत असलेला ऐतिहासिक आठवडे बाजार आता अधिक नियोजनबद्ध आणि सुविधायुक्त पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज पार्किंग येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पर्यटकांची गैरसोय आणि बाजार व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाबळेश्वर नगरपरिषदेकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

   या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेवक, पालिका अधिकारी तसेच व्यापारी प्रतिनिधींनी नव्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुविधांचा आढावा घेतला. बाजार सुरू करण्यापूर्वी परिसराची संपूर्ण स्वच्छता करून आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी संबंधित विभागांना दिले.

  एल. सी. डिसोजा रोडवर आठवडे बाजार भरत असल्यामुळे प्रत्येक आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. याचा फटका स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही बसत होता. नवीन ठिकाणी बाजार भरल्यामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिक आणि पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.

 नगरपरिषदेच्या नियोजनानुसार व्यापाऱ्यांना शिस्तबद्ध पद्धतीने गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून बाजार अधिक सुसज्ज करण्यावर भर दिला जाणार आहे. बाजार आणि पार्किंगची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने पर्यटकांनाही मोठी सोय होणार आहे.

 पाहणी दौऱ्यात शहरातील प्रमुख नगरसेवक, पालिका अधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. जागेची स्वच्छता, प्राथमिक नियोजन आणि आवश्यक सुविधा पूर्ण झाल्यानंतर आठवडे बाजार नव्या ठिकाणी अधिकृतपणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली.

बाजार स्थलांतराचे प्रमुख फायदे
एल. सी. डिसोजा रोडवरील वाहतूक कोंडी कमी होणार.
व्यापाऱ्यांसाठी नियोजनबद्ध गाळे व्यवस्था.
पिण्याचे पाणी, स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाची सुविधा.
पर्यटकांसाठी पार्किंग व बाजार एकाच ठिकाणी उपलब्ध.
शहराच्या वाहतूक आणि पर्यटन व्यवस्थापनाला चालना.
आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला