हातगेघर ठराव फसला; जावळीतील राजकारण तापले, मानकुमरे बंधूंचा शिंदेंवर थेट राजकीय हल्लाबोल
Satara News Team
- Fri 7th Aug 2026 08:22 pm
- बातमी शेयर करा
मेढा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातगेघर विकास सेवा सोसायटीच्या ठरावासाठी बोलावलेली सभा कोरमअभावी पार पडू न शकल्याने जावळी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर काही तासांतच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून मानकुमरे गटाने शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार राजकीय टीका केली आहे.
ठराव प्रक्रिया पूर्ण न झाल्यानंतर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर संचालकांना ताब्यात ठेवल्याचा आरोप केला. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन संचालकांना समोर आणण्याची मागणी केली. या आरोपांवर शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.
या घडामोडीनंतर मानकुमरे यांचे बंधू बापुसाहेब मानकुमरे यांनी फेसबुकवर “FIVE Times… यापुढे कधीच नाही” या मथळ्याची पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये शशिकांत शिंदे यांच्या विविध निवडणुकांतील पराभवांचा उल्लेख करत त्यांच्या राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पोस्टमध्ये २०१९ ची कोरेगाव विधानसभा, २०२१ ची जिल्हा बँक निवडणूक, २०२४ ची सातारा लोकसभा, २०२४ ची कोरेगाव विधानसभा तसेच सध्याच्या घडामोडींचा संदर्भ देत सलग पराभवांचा दावा करण्यात आला आहे.
हातगेघर सोसायटीतील ठराव फसल्याच्या घटनेनंतर लगेचच ही पोस्ट व्हायरल झाल्याने सहकार क्षेत्रातील निवडणूक आता केवळ ठरावांपुरती मर्यादित न राहता सोशल मीडियावरही राजकीय संघर्षाचे नवे रणांगण तयार झाल्याची चर्चा सुरू आहे. जावळी आणि कोरेगाव परिसरात या घटनाक्रमाची मोठी राजकीय चर्चा रंगली असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 7th Aug 2026 08:22 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 7th Aug 2026 08:22 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 7th Aug 2026 08:22 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 7th Aug 2026 08:22 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 7th Aug 2026 08:22 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Fri 7th Aug 2026 08:22 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 7th Aug 2026 08:22 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Fri 7th Aug 2026 08:22 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Fri 7th Aug 2026 08:22 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Fri 7th Aug 2026 08:22 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Fri 7th Aug 2026 08:22 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Fri 7th Aug 2026 08:22 pm












