सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, कास धरणाने जुनी पाणीपातळी ओलांडली
Satara News Team विजय माने
- Sun 10th Jul 2022 09:35 am
- बातमी शेयर करा
कास धरणाने २५ फुटांची जुनी पाणीपातळी ओलांडली आहे. काही दिवसांतच कास धरणात ०.०३ टीएमसी पाणीसाठा होईल, असा विश्वास नगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.सातारा शहराच्या प्रामुख्याने पश्चिम भागास कास धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्याशिवाय कास परिसरातील १५ गावांनाही कास धरणातूनच पाणीपुरवठा होतो. कास धरणाची पूर्वीची पाणीसाठवण क्षमता ०.०१ टीएमसी होती. कास धरणाची पाणीसाठवण क्षमता ०.०५ टीएमसी करण्यात आली आहे. पूर्वीच्या क्षमतेच्या पाचपट पाणीसाठा कास धरणात होणार आहे. यावर्षी कास धरणात ०.०३ टीएमसी पाणीसाठा केला जाणार आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेस पावसाची रिपरिप सुरु आहे. साताऱ्यास पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची पाणीपातळी २७ फुटांवर पोहोचली आहे. कास धरणाने २५ फुटांची जुनी पाणीपातळी ओलांडली आहे. काही दिवसांतच कास धरणात ०.०३ टीएमसी पाणीसाठा होईल, असा विश्वास नगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.सातारा शहराच्या प्रामुख्याने पश्चिम भागास कास धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्याशिवाय कास परिसरातील १५ गावांनाही कास धरणातूनच पाणीपुरवठा होतो. कास धरणाची पूर्वीची पाणीसाठवण क्षमता ०.०१ टीएमसी होती. कास धरणाची पाणीसाठवण क्षमता ०.०५ टीएमसी करण्यात आली आहे. पूर्वीच्या क्षमतेच्या पाचपट पाणीसाठा कास धरणात होणार आहे. यावर्षी कास धरणात ०.०३ टीएमसी पाणीसाठा केला जाणार आहे.कास धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडत आहे. परिसरातील ओढे, नाले जोरदार वाहू लागले आहेत. त्यामुळे कास धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाची पाणपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांत धरणाची पाणीपातळी तिप्पट झाली. पूर्वी २५ फूट पाणीसाठा झाल्यानंतर सांडव्यातून पाणी पडून धरण ओव्हरफ्लो व्हायचे. आता धरणाची उंची वाढवल्यामुळे अपेक्षित पाणीसाठा होण्यासाठी काही दिवस लागणार आहे. चार-आठ दिवसांत धरण भरेल, असा अंदाज नगरपालिका प्रशासनाचा आहे. कास धरण भरल्यानंतर पुढील वर्षीपासून पाणी कपातीची शक्यता राहणार नाही.
#kas
#satarawater
#sataranewswkas
#sataranewskaslake
#sataranewslive
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Sun 10th Jul 2022 09:35 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sun 10th Jul 2022 09:35 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sun 10th Jul 2022 09:35 am
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Sun 10th Jul 2022 09:35 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sun 10th Jul 2022 09:35 am
संबंधित बातम्या
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sun 10th Jul 2022 09:35 am
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sun 10th Jul 2022 09:35 am
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sun 10th Jul 2022 09:35 am
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sun 10th Jul 2022 09:35 am










