छत्रपती कृषी,औद्योगिक, वाहन महोत्सवाच्या प्रदर्शन सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी पर्वणी... श्री.छ.उदयनराजे भोसले.
Satara News Team
- Wed 18th Oct 2023 09:49 pm
- बातमी शेयर करा
सातारा : .स्मार्ट एक्स्पो ग्रुप च्या व्यवस्थापन अन्तर्गत व मा.श्रीमंत छ. उदयन राजे भोसले मित्र समूह , जय सोशल फौंडेशन चे वतीने छत्रपती कृषी 2023भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कृषी,औद्योगिक, वाहन व पशु पक्षी प्रदर्शन 2023 चे स्मार्ट एक्सपो यांच्यावतीने आयोजित केलेल्या सातारा जिल्हा परिषद मैदानावरील छत्रपती कृषी औद्योगिक वाहन महोत्सव चे उद्घाटन सोहळ्यास सातारा जिल्ह्याचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उद्घाटक म्हणून उपस्थित राहून या सोहळ्यासाठी आलेल्या हजारो सातारकरांचा आनंद द्विगुणित केला.
या छत्रपती महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ज्येष्ठ कृषी तज्ञ आणि कृषी क्षेत्रातील मार्गदर्शक डॉ. बुधाजीराव मुळीक, माजी जि प शिक्षण सभापती सुनील काटकर,स्मार्ट एक्सपोर्टचे प्रमुख संयोजक सोमनाथ शेटे जय सोशल फाउंडेशन चे सागर भोसले यांचे सह जिल्हा कृषी अधीक्षक सौ.भाग्यश्री फरांदे,उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदास काळे ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ,कृषी विकास अधिकारी विजय माइणकर ,प्रीतम कळसकर, शिवानी कळसकरमाजी नगराध्यक्ष सौ.रंजना रावत ,सौ.रेखा शेटे, जितेंद्र खानविलकर ,पंकज चव्हाण ,संग्राम बर्गे, काका धुमाळ,विविध शेती तसेच पशु विभागाचे मान्यवर अधिकारी जय सोशल फाउंडेशनचे क्रियाशील सदस्य कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत सरकारच्या वतीने 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले असल्यामुळे या प्रदर्शनाच्या अग्रभागी जागर पौष्टिक तृणधान्य यांचा हे साकारलेले विविध तृणधान्यांचे प्रदर्शनही लक्षवेधक ठरत आहे.
तब्बल 225 हून अधिक नामवंत देशातील कंपन्यांच्या विक्री स्टॉल मध्ये सहभाग असलेले या महोत्सवासाठी पुढील पाच दिवस सातारकरांना एक परवणीच लाभली आहे.
उद्घाटन सोहळ्यात त श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी फित कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले
यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना उदयनराजे भोसले म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी मी पुढे येत असताना डॉ.मुळीक साहेबांसाठी मार्गदर्शक या उद्घाटन सोहळ्यात सहभाग मार्गदर्शन करत आहेत याचा विशेष आनंद वाटतो. डॉ.मुळीक साहेबांनी स्वतःची जीवनशैली शेतकऱ्यांसाठी वाहिली. आज छत्रपतींची आठवण आली तरी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणा सर्वांना विचार दिला होता आज हे प्रदर्शन खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण ठरणारे लोकशाहीची संकल्पना ही महाराज साहेबांचीच होती लोकांचा सहभाग गरजेचा हेच ध्येय धोरण आम्ही पुढे अंगीकारत आहोत.आज शेतकऱ्यांसाठी आपण झटत असताना देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटित झालेल्या आणि शेतकऱ्यांसाठी नव्या युगात खऱ्या अर्थाने मित्र ठरणाऱ्या प्रभावी तंत्रज्ञानाची कमाल असलेला खते ,औषधे स्प्रिंकलिंग करणारा स्वयंचलित ड्रोन या प्रदर्शन महोत्सवाचे आकर्षण आहे तसेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील दीड टन वजनाचा गजेंद्र हा सहा वर्षाचा रेडा या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे,याचे विशेष आनंद होत आहे. हे प्रदर्शन आपणा सर्वांसाठी खरोखरच मार्गदर्शक ठरेल व यातून आपल्याला नवनवीन विकास आणि तंत्रज्ञानाची ओळख होईल.
उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांना प्रदर्शन करताना डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले की साताऱ्यात खासदार उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली भरलेले हे प्रदर्शन आता देश पातळीवर जाणे गरजेचे आहे .
आज वरील अनेक कृषी प्रदर्शनात मी सहभागी होतो. मात्र हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने आगळे वेगळे आणि संयोजनाचा एक आदर्श असे उदाहरण आहे.सध्या शेतकऱ्यांना भीतीदायक ठरणारा लम्पी रोग साताऱ्यात मात्र कमी आहे अशी प्रदर्शने खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाचा केंद्रबिंदू असून हे प्रदर्शन भविष्यात खरोखरच देश स्तरावर मार्गदर्शनाचा एक टप्पा ठरेल असे वाटते. आता तुम्ही सर्वांनी जागृत होणे गरजेचे आहे. सातत्याने सर्वांनी न थांबता पुढे जरुरीचे आहे महाराज साहेबांबरोबर आपल्या सर्वांची साथ यासाठी महत्त्वाची आणि मोलाची आहे. राजे साहेबांना खऱ्या अर्थाने आता कृषी मंत्री करणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
कार्यक्रम संयोजक सोमनाथ शेटे, रेखा शेटे व हेमलता भोसले यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोरे यांनी अतिशय प्रभावीपणे केले.
छत्रपती कृषी महोत्सवांमध्ये दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळा देशी विदेशी जातीच्या नामवंत श्वानांच्या करिता श्वानप्रेमींकडून स्पेशल डॉग शोचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Wed 18th Oct 2023 09:49 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Wed 18th Oct 2023 09:49 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Wed 18th Oct 2023 09:49 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Wed 18th Oct 2023 09:49 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Wed 18th Oct 2023 09:49 pm
संबंधित बातम्या
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Wed 18th Oct 2023 09:49 pm
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Wed 18th Oct 2023 09:49 pm
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Wed 18th Oct 2023 09:49 pm
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Wed 18th Oct 2023 09:49 pm










