दुय्यम निबंधक कार्यालयात रंगला पार्टीचा खेळ,अधिकारी कर्मचाऱ्यांना कामालाही नाही वेळ
प्रकाश शिंदे - Wed 2nd Nov 2022 02:18 pm
- बातमी शेयर करा
सातारा- सातारा येथील सह. दुय्यम निबंधक कार्यालय क्र.१ च्या कार्यालयात बुधवारी दुपारी सर्व कर्मचारी आणि अधिकारी चक्क तंदूर आणि बिर्याणीच्या मेजवानीचा आनंद घेत असल्याचे निदर्शनास आले.बाहेर कामासाठी आलेल्या पक्षकाराना ताटकळत ठेऊन अधिकारी व कर्मचारी कार्यालयातील कामकाजाच्या टेबलावर एकत्रितपणे बिर्याणी व तंदूर वर ताव मारत भारत-बांगलादेश क्रिकेट सामना पाहण्यात मग्न झाले होते.या घटनेने तेथे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सातारा तहसील कार्यालयाच्या आवारातच सहा.दुय्यम निबंधक कार्यालय आहे.तालुक्यातील समाविष्ट गावांमधील जमीन खरेदी-विक्रीचे दस्त या कार्यालयात होत असल्याने येथे चांगलीच गर्दी असते.बुधवारीही येथे नेहमीप्रमाणे गर्दी होती.मात्र दुपारच्या सुमारास कार्यालयातच बिर्याणीचा भरलेला टोप व त्यासोबत तंदुरी चिकन आणण्यात आले.मग काय... उपस्थित अधिकारी व कर्मचाऱयांनी हातातील कामे बाजूला सारून लगेचच त्यावर ताव मारायला सुरुवात केली.त्याबरोबरच भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मैचचाही आस्वाद घेण्यास सुरुवात केली.बराच वेळ हे अधिकारी व कर्मचारी या रंगतदार सोहळ्यात मग्न झाले होते.
कार्यालयात मेजवणीचा हा प्रकार सुरू असतानाच बाहेर मात्र या कार्यालयात कामासाठी आलेले पक्षकार ही पार्टी कधी संपेल? याची वाट पाहत ताटकळत उभे होते.मात्र मेजवणीत मश्गुल झालेल्या अधिकारी व कर्मचाऱयांना त्याचे कोणतेही सोयर-सुतक न्हवते.त्यामुळे ताटकळलेले पक्षकार चांगलेच वैतागले होते.याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही उलट सुलट पद्धतीने उत्तर देत एखाद्या पक्षकाराने मेजवानी दिल्यास नकार देता येत नाही अशी बेजबाबदार उत्तरे संबंधित अधिकाऱ्याने दिली.त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची तक्रार सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
या घटनेने सहा. दुय्यम निबंधक कार्यालयात नेमके चालले आहे तरी काय? कार्यालयात आणण्यात आलेली बिर्याणी व तंदुरी ही कोणत्या पक्षकाराने दिली? जर दिली तरी ती कोणत्या कारणाने दिली?या कार्यालयीन मेजवणीची दखल जिल्हाधिकारी घेणार का? असे अनेक प्रश्न या घटनेने उपस्थित झाले असून या बिर्याणी व तंदूर मेजवणीची उलट-सुलट चर्चा दिवसभर तहसीलदार कार्यालय परिसरात सुरू होती.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 2nd Nov 2022 02:18 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 2nd Nov 2022 02:18 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 2nd Nov 2022 02:18 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 2nd Nov 2022 02:18 pm
संबंधित बातम्या
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Wed 2nd Nov 2022 02:18 pm
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Wed 2nd Nov 2022 02:18 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 2nd Nov 2022 02:18 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Wed 2nd Nov 2022 02:18 pm
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Wed 2nd Nov 2022 02:18 pm
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Wed 2nd Nov 2022 02:18 pm
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Wed 2nd Nov 2022 02:18 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Wed 2nd Nov 2022 02:18 pm













