जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न हाणून पाडू : उदयनराजेंचा इशारा
Satara News Team
- Thu 15th Jun 2023 10:46 am
- बातमी शेयर करा
सातारा :- “शिवप्रभुंचा सातरस्ता पोवईनाका येथे असलेले पूर्णाकृती पुतळारुपी शिवस्मारक सर्वांचे प्रेरणास्थान आहे. हे प्रेरणास्थान कायम शिवस्मारक म्हणूनच राहणे आवश्यक आहे.
शिवप्रभुंपेक्षा दिग्गज किर्तीचे कोणी होईल किंवा कोणी असेल असे वाटत नाही. याठिकाणी अन्य कोणाच्या नावाने काही करण्याचे कोणीही धाडस करु नये. अधिकार गाजवून, जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा कोणी हिन प्रकार करत असेल तर तो जनतेच्या माध्यमातून हाणून पाडला जाईल, अला इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. फेसबूक पोस्ट करून त्यांनी हा इशारा दिला आहे.
उदयनराजे भोसले यांनी फेसबूक पोस्टमध्ये लिहीले की, “सातरस्ता म्हणून ओळखला जाणारा पोवईनाका परिसर हे सातारा शहराचे नाक आहे. याठिकाणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे स्मारक आहे. या स्मारकाचे सध्या सर्वांच्या सहकार्याने आणि नगरपरिषदेच्या माध्यमातुन चांगले सुशोभिकरण होत आहे. सातारकरांनाच नव्हे तर येथून जाणा-या-येणा-या सर्वांनाच हा शिवस्मारक परिसर प्रेरणा देणारा आहे. या प्रेरणास्थानाच्या ठिकाणी अन्य काही महापुरुषांचे स्मारक किंवा आईसलॅन्ड करण्याचे कोणी घाट घालत असेल तर जनतेच्या अस्मितेवर तो घाला असेल. स्वराज्याचे शिल्पकार शिवप्रभुंचे कर्तुत्व झाकाळले जाईल. असे काही कोणी करण्याचा प्रयत्न जरी केला तर ते प्रयत्न हाणून पाडले जातील. लोककल्याणकारी शिवप्रभुंची तुलना अन्य कोणाशी होवू शकणार नाही आणि तसा प्रयत्न देखील कोणी करु नये अशी माफक अपेक्षा आहे,” असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
#shamburaj
#shivtirth
#udaynraje
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 15th Jun 2023 10:46 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 15th Jun 2023 10:46 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 15th Jun 2023 10:46 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 15th Jun 2023 10:46 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 15th Jun 2023 10:46 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 15th Jun 2023 10:46 am
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Thu 15th Jun 2023 10:46 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 15th Jun 2023 10:46 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Thu 15th Jun 2023 10:46 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Thu 15th Jun 2023 10:46 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Thu 15th Jun 2023 10:46 am
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Thu 15th Jun 2023 10:46 am
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Thu 15th Jun 2023 10:46 am












