शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत तहसीलदारांना निवेदन
गुलाब पठाण
- Fri 20th Oct 2023 07:14 pm
- बातमी शेयर करा
किडगाव. : सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठांतर्गत सर्व शैक्षणिक संघटना यांच्या वतीने शालेय शिक्षण व महाविद्यालयातील प्रलंबित प्रश्नाबाबत सातारा तालुक्याचे तहसीलदार यांना विविध शैक्षणिक संघटनांच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्यात आले .
या मोर्चाची सुरुवात शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिक्षक निवेदन देण्यासाठी घोषणा देत तहसीलदार ऑफिस येथे गेले त्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात गेल्या बारा वर्षापासून शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे न भरल्यामुळे सर्व शाळांच्या समोर गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत रिक्त शिक्षक यांची पदे भरण्याची घोषणा जरी करण्यात आली असली तरी संच मान्यता रोस्टर व संच मान्यता दुरुस्ती प्रकरणे अजूनही प्रशासन स्तरावर प्रलंबित आहेत त्यामुळे भरती प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य आहे. रोज नवीन निर्णय निर्गमित होत आहेत आता तर कंत्राटी पद्धतीने खाजगी संस्थामार्फत शिक्षकांची भरती करण्याचे ठरले आहे. शाळांमधील विद्यार्थी संख्या आधार संलग्नित करून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून दूर करून असंख्य शिक्षक अतिरिक्त करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाचा निर्णय विरुद्ध वरील कामे करण्यात येत आहेत.
2024 पासून नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणताना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ठरवण्याचा जुना आकृतीबद्दल रद्द करून नवीन करण्यात यावा.खाजगी संस्थांना शाळा दत्तक योजना लागू केलेली आहे त्याचप्रमाणे 2017 पासून उच्च महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बंद आहे.

अनुदानित शाळा व महाविद्यालय बंद करण्याची रोज नवीन निर्णय जारी करण्यात येत आहेत. नवीन शिक्षण धोरणानुसार उच्च शिक्षणातील प्रचलित शिक्षण व्यवस्था पूर्णपणे नष्ट होणार असून विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर जाणार आहेत. त्याचबरोबर नवीन शाळा वाटप धोरण आल्याशिवाय नवीन शाळा वाटप बंद करावे. शिक्षणावर होणारा खर्च मर्यादित न ठेवता राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के करण्यात यावा. कंत्राटी, घड्याळी तासानुसार शिक्षक, प्राध्यापक भरती पूर्णपणे बंद करण्यात यावी. सर्व थकीत अनुदान वेतने तर अनुदान पूर्णपणे अदा करण्यात यावीत. पवित्र पोर्टल मार्फत होणारी शिक्षक भरती ही विविध न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार करण्यात यावी. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. शाळा तिथे क्रीडा शिक्षक अंमलबजावणी व्हावी. शिक्षकांची शालाबाह्य कामे पूर्णपणे बंद करून फक्त विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे काम करुन दयावे.
मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, सातारा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अरविंद कदम , जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव सुनील गाडे, सातारा तालुक्याचे सचिव आनंदा मोरे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे महासचिव अनिल माने, रमेश इंगवले, शारीरिक शिक्षक संघटनेचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष आर वाय जाधव, सातारा तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष विजय यादव, मोहनराव जाधव व सर्व संस्थाचालक शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Fri 20th Oct 2023 07:14 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 20th Oct 2023 07:14 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 20th Oct 2023 07:14 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 20th Oct 2023 07:14 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 20th Oct 2023 07:14 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 20th Oct 2023 07:14 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Fri 20th Oct 2023 07:14 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Fri 20th Oct 2023 07:14 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 20th Oct 2023 07:14 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 20th Oct 2023 07:14 pm













