तापोळा येथील विहंगम गॅलरीला ‘हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे’ नाव देण्याची मागणी; घाट रस्त्यांवर रिफ्लेक्टर बसविण्याचीही मागणी
Satara News Team
- Wed 17th Jun 2026 09:25 pm
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर : तापोळा येथील पूर्ण झालेल्या प्रस्तावित पुलाजवळ उभारण्यात येणाऱ्या विहंगम गॅलरीला शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाबळेश्वर शहर संघटनेने केली आहे. याबाबत बांधकाम विभागाचे अभियंता अजय देशपांडे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रासह देशभरातील हिंदुत्ववादी विचारसरणीला दिशा देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तापोळा येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या विहंगम गॅलरीचे नामकरण ‘हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे विहंगम गॅलरी’ असे करण्यात यावे. त्यामुळे या पर्यटनस्थळाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख प्राप्त होईल, असे शिवसेनेचे मत आहे.
याच निवेदनाद्वारे महाबळेश्वर परिसरातील घाट रस्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. पावसाळ्यात महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येणे कठीण होते. त्यामुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाबळेश्वर ते केळघर घाट, महाबळेश्वर ते पाचगणी आणि महाबळेश्वर ते प्रतापगड या प्रमुख मार्गांच्या दोन्ही बाजूंना तातडीने रिफ्लेक्टर बसविण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसाळ्यात दृश्यमानता कमी झाल्याने अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे रस्ते सुरक्षा उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. वेळेत रिफ्लेक्टर बसविल्यास वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
दरम्यान, तापोळा येथील विहंगम गॅलरीला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी आणि घाट रस्त्यांवरील सुरक्षाविषयक उपाययोजना या दोन्ही विषयांमुळे स्थानिक स्तरावर चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, उपशहर प्रमुख राजेश साळवी, युवा सेना शहरप्रमुख आकाश साळुंखे, शहनवाज भाई खारखंडे, आसिफ भाई माहापुळे, आली भाई वारुणकर, तेजस बोधले, राहुल खरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 17th Jun 2026 09:25 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 17th Jun 2026 09:25 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 17th Jun 2026 09:25 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 17th Jun 2026 09:25 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 17th Jun 2026 09:25 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Wed 17th Jun 2026 09:25 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Wed 17th Jun 2026 09:25 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Wed 17th Jun 2026 09:25 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 17th Jun 2026 09:25 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 17th Jun 2026 09:25 pm













