राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल
धीरेनकुमार भोसले
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
- बातमी शेयर करा
कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याचा आरोप
दहिवडी : दहिवडीचे उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यास ढकलून देत शिवीगाळ केल्याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार दि.२०/१२/२०२३ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संदीप मोहन आवटे(रा.दहिवडी) हे दहिवडी नगरपंचायती शेजारी पाणीपुरवठा, लाईटविभाग,घंटागाडी इत्यादी विभागाचे सार्वजनिक काम करत होते. त्यावेळी आवटे यांना ते काम करू न देता उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी अटकाव केला.त्याचबरोबर तुपेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या आतमध्ये नगरपंचायतच्या लाईटची लाईन नसताना तु तेथे बल्ब का बसवला नाही? या कारणावरून राजेंद्र साळुंखे यांनी संदीप आवटे यांना ढकलून देऊन शिवीगाळ केल्याने माजी आयुक्त असलेल्या प्रभाकर देशमुखांना त्यांच्याच राष्ट्रवादीतील उपनगराध्यक्षांनी कर्मचाऱ्यास ढकलून देत शिवीगाळ करणे कितपत योग्य वाटते? अशी चर्चा दहिवडीत रंगली होती.याप्रकरणी त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून राजेंद्र साळुंखे यांच्यावर धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस फौजदार श्री.खाडे करत आहेत.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 21st Dec 2023 01:31 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 21st Dec 2023 01:31 pm













