लंम्पी चर्मरोगमुळे मृत्यु झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना 3 कोटी 77 लाख 89 हजार वाटप
अनुदान वाटप सातारा जिल्हा राज्यात प्रथमSatara News Team
- Thu 6th Apr 2023 03:59 pm
- बातमी शेयर करा
सातारा : लंम्पी चर्म रोगामुळे मृत्यु झालेल्या 1 हजार 456 पशुधनास शासनाने 3 कोटी 77 लाख 89 हजार रुपये पशुपालकांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. हे अनुदान वाटप करण्यात सातारा जिल्हा राज्यात प्रथम स्थानी असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.लंम्पी चर्म रोगामुळे जिल्हयातील 20 हजार 422 जनावरांना लागन झाली होती. लंम्पी चर्म रोगामुळे जिल्हयात 1 हजार 489 पुशधनाचा मृत्यु झाला होता. त्यापैकी 1 हजार 456 पशुधनास शासनाने 3 कोटी 77 लाख 89 हजार रुपये पशुपालकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. लंम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजाराने जिल्हयातील 1 हजार 456 जनावरांचा मृत्यु झाला होता. खबरदारीच्या उपायोजनांमध्ये 100 टक्के म्हणजेच 3 लाख 47 हजार जनावरांचे लसीकरणही करण्यात आले होते. त्याचबरोबर लाळ खुरकुत या आजारापासून संरक्षण व्हावे म्हणूनही 5 लाख 57 हजार 200 जनावरांचेही लसीकरण करण्यात आले आहे.शेतकरी हे शेतीबरोबर एक शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून पशुपालन करत असतात. जिल्हयात 1 हजार 456 जनावरांचा मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान शासनाने 3 कोटी 77 लाख 89 हजार अनुदानाच्या स्वरुपात भरुन काढले. या अनुदानामुळे मृत्यु झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना नव्याने जनावरे खरेदी करण्यास मोठी मदत झाली आहे.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 6th Apr 2023 03:59 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 6th Apr 2023 03:59 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 6th Apr 2023 03:59 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 6th Apr 2023 03:59 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 6th Apr 2023 03:59 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 6th Apr 2023 03:59 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 6th Apr 2023 03:59 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 6th Apr 2023 03:59 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 6th Apr 2023 03:59 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 6th Apr 2023 03:59 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 6th Apr 2023 03:59 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 6th Apr 2023 03:59 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 6th Apr 2023 03:59 pm













