नेताजी सुभाष चंद्र बोस वाचनालय सोमर्डी. या वाचनालयाला सौ.वेदांतिकाराजे भोसले यांनी दीड लाख रुपयाचे संगणकीय साहित्य दिले.

जावली ; जावली तालुक्यातील सर्व वाचकांसाठी व पुस्तक प्रेमींसाठी सदैव उघडे असणारे सुभाष चंद्र बोस वाचनालय सोमरडी या वाचनालयाला काही दिवसांपूर्वी भाजप नेते श्री मा. प्रवीण दरेकर साहेबांनी एक लाख रुपये दिले होते व त्यानंतर आता या नेताजी सुभाष चंद्र बोस वाचनालयाला सौ.वेदांतिकाराजे भोसले यांनी दीड लाख रुपयांचे संगणकीय साहित्य भेट दिले आहे. जावली तालुक्यामध्ये यूपीएससी एमपीएससी तसेच स्पर्धा परीक्षांबरोबर केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या नोकऱ्यांकडे तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणावर वळत आहे जावली तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना शेतजमीन ही फार अल्प असल्याने व येथे कंपन्या व स्थानिक नोकऱ्या फार कमी असल्याने या तालुक्यातील तरुण वर्गांला या स्पर्धेच्या जगामध्ये फार कष्ट करून अभ्यास करून पुढे जावे लागते व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठीही मुंबई पुण्याला जावे लागते. त्यातच नुकतेच जावली तालुक्यामध्ये यूपीएससी एमपीएससी मध्ये निवड झालेले ही गुणवंत मुले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन अनेक जण या स्पर्धा परीक्षांकडे वळत आहेत वाचनालयाचे अध्यक्ष श्री संदीप परामणे यांनी स्पर्धात्मक परीक्षा व स्पर्धा परीक्षा अभ्यासिका चालू केली आहे. सौ.वेदांतिकाराजे भोसले यांनी दिलेल्या संगणकीय साहित्य मुळे व स्पर्धा परीक्षा व स्पर्धात्मक परीक्षांच्या अभ्यासिका योजनेमुळे गरजू व अभ्यासू तसेच स्थानिक मुलांना याचा चांगला फायदा होणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला