पाटणचे आ.शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आ.महेश शिंदे यांची दुखरी नस राष्ट्रवादीच

दोघांच्‍याही निर्णयामागे ‘राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारी अडचणच

सातारा न्यूज सातारा : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सातारा जिल्‍ह्यातून पाटणचे आमदार व गृहराज्‍यमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे सहभागी झाले आहेत. दोघांच्‍याही निर्णयामागे ‘राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारी अडचण’ याच कारणाचा समान धागा आहे.

वास्‍तविक, शिवसेनेवर अवलंबून राहावं, अशी या दोन्‍हीही नेत्‍यांची परिस्‍थिती नाही. दोघेही शिवसेनेच्‍या तिकिटावर लढले असले, तरी आपापल्‍या मतदारसंघात स्‍वतःच्‍या ताकदीवर निवडून आलेले आहेत. महेश शिंदे हे तर मूळचे भाजप विचारांचेच आहेत. शिवसेना-भाजप युतीच्‍या जागावाटपात कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेकडे होता. म्‍हणून भाजपने शिंदे यांना शिवसेनेच्‍या तिकिटावर लढविले होते. त्‍यामुळे आगामी काळात त्‍यांनी भाजपमध्ये उडी घेतली तरी आश्‍चर्य वाटण्याचं कारण नाही. शंभूराज देसाई यांनी याआधीच्‍या निवडणुका शिवसेनेच्‍या चिन्‍हावरच लढल्‍या होत्‍या. पाटण तालुक्‍यात त्‍यांची स्‍वतःचीच एवढी ताकद आहे, की पक्षामुळे ते विजयी होतात असे नव्‍हे, तर त्‍यांच्यामुळे शिवसेनेला एक आमदार मिळतो, अशी स्‍थिती आहे.

 
अशाप्रकारे दोघेही मातब्‍बर असल्‍यामुळे त्‍यांच्या बंडामुळे दोन्‍हीही मतदारसंघांत अपवाद वगळता तीव्र प्रतिक्रिया उमटलेली नाही. कोरेगाव मतदार संघात आधीपासूनच शिवसेनेची ताकद नगण्य आहे. शिंदे यांचे बहुतांश कार्यकर्ते हे काँग्रेस आणि राष्ट्रीवादीतून आलेले आहेत. त्‍यामुळे तेथे बंडखोरीच्‍या विरोधात प्रतिक्रिया येण्याचा प्रश्‍नच नाही. देसाईंची स्‍थितीही फारशी वेगळी नाही. मात्र, पाटण मतदारसंघातील जनतेचा मुंबईशी असलेला ‘कनेक्‍ट’ लक्षात घेता तिथल्‍या मूळ शिवसैनिकांमधून देसाईंच्‍या निर्णयावर नाराजी दिसून येते. याचा फटका त्‍यांना स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकीतही बसू शकतो. बंड यशस्‍वी झाल्‍यास त्‍याचे स्‍थानिक राजकारणावर परिणाम होण्याची शक्‍यता दिसून येत नाही. अयशस्‍वी झाल्‍यास मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचं ‘नॅरेटिव्ह’ बदलू शकतं. पाटणमधील जनतेच्‍या मुंबई कनेक्शनमुळे देसाईंचा विजय आजच्‍या इतका सहजसोपा राहणार नाही, तर कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी शशिकांत शिंदेंसाठी ताकद लावण्यात किती यशस्‍वी होणार, यावर महेश शिंदे यांचे भवितव्‍य अवलंबून राहणार आहे. तात्‍पर्य, देसाई आणि शिंदे यांची राष्ट्रवादी हीच दुखरी नस आहे.

कोरेगाव मतदार संघात आधीपासूनच शिवसेनेची ताकद नगण्य आहे. शिंदे यांचे बहुतांश कार्यकर्ते हे काँग्रेस आणि राष्ट्रीवादीतून आलेले आहेत. त्‍यामुळे तेथे बंडखोरीच्‍या विरोधात प्रतिक्रिया येण्याचा प्रश्‍नच नाही  मात्र, पाटण मतदारसंघातील जनतेचा मुंबईशी असलेला ‘कनेक्‍ट’ लक्षात घेता तिथल्‍या मूळ शिवसैनिकांमधून देसाईंच्‍या निर्णयावर नाराजी दिसून येते. याचा फटका त्‍यांना स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकीतही बसू शकतो.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला