एक पाऊल सकारात्मकतेचे या पुस्तकातील गोष्टी म्हणजे सामान्य माणसाची बखर - स्वागत थोरात

सातारा : "या पुस्तकातील गोष्टी सामान्य माणसांच्या बखरी या काळातील सामान्य माणसांच्या विचारांचे पैलू अभ्यासण्यासाठी पुढील काळात अभ्यासक संदर्भ म्हणून वापरतील" असे प्रतिपादन प्रकाशयात्री स्वागत थोरात यांनी केले. 
अॅड डॉ सुचित्रा घोगरे-काटकर लिखित एक पाऊल सकारात्मकतेचे या पुस्तकाचे प्रकाशन साताऱ्यात झाले. यावेळी अध्यक्षस्थानी स्वागत थोरात होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विधिज्ञ अॅड डॉ सुधाकर आव्हाड, शब्द शिवार प्रकाशनचे इंद्रजित घुले, संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, जेष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे उपस्थित होते. 
समाजातील सकारात्मक उर्जा शब्द रुपात या पुस्तकात एकत्र झाली असून आजच्या निराशाजनक काळात हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे असे मत यावेळी अॅड. सुधाकर आव्हाड यांनी केले. 
एक पाऊल सकारात्मकतेचे या पुस्तकाच्या ५०० प्रती रुरल रिलेशन्स च्या प्रदीप लोखंडे यांनी सुरू केलेल्या ग्रंथालयांसाठी देणगी स्वरुपात देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ महेश शिंदे यांनी केले. पाहुण्यांची ओळख शुभांगी दळवी यांनी तर आभार डॉ ज्योती काटकर यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कारंजकर यांनी केले. यावेळी कायदा, वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला