विवेक वाहिनी समाज प्रबोधनाचे साधन : प्रशांत पोतदार

सातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विवेक वाहिनी ही समाज प्रबोधन व वैज्ञानिक दृष्टीकोन रुझविण्याचे साधन आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जनरल सेक्रेटरी प्रशांत पोतदार यांनी केले. 
             विवेक वाहिनी समिती व राष्ट्रीय सेवा योजना आयोजित दहिवडी महाविद्यालयात विवेक वाहिनीच्या उद्‌घाटन कार्यक्रमात पोतदार बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.टी.साळुंखे होते. यावेळी प्रा.के.एस.शिंदे,सुनिल रणदिवे व प्रा.हनुमंत कायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
              प्रशांत पोतदार म्हणाले, "आपला विकास आपल्या हाती, हक्क हवे तर कर्तव्य आधी." हे विवेक वाहिनीचे बोधवाक्य आहे. नियमित व्यायाम व सकसआहार, वैचारिक वाचन, स्वतः निर्व्यसनी असणे, खादीचा वापर व अन्य धर्मियांशी जाणीवपूर्वक मैत्री करणे. ही विवेक वाहिनीची पंचसूत्री आहे. व्याख्याना दरम्यान समाजात भोंदूगिरीच्या माध्यमातून चालणारी फसवेगीरीबाबतही पोतदार यांनी विविध प्रात्यक्षिके करून दाखविली. अंधश्रद्धा मुक्त समाज निर्मितीसाठी शिक्षणाबरोबरच चिकित्सक बुद्धी व मानसिक तयारी सुद्धा खूप महत्वाची आहे. महाविद्यालयीन युवक, युवतींना विवेक वाहिनीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या कार्यात सक्रीय होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
         प्राचार्य डॉ.साळुंखे म्हणाले, "विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन व अंधश्रध्दा मुक्त समाज निर्माण करण्याचे कार्य विवेक वाहिनीच्या माध्यमातून करण्यात येते. डॉ. नरेंद्र दाभोळकर व डॉ.एन.डी. पाटील यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचे कार्य विवेक वाहिनी करत आहे. विवेक वाहिनीच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या कार्यात प्रत्येकाने योगदान द्यावे."
    प्रा.भक्ती पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा.दत्तात्रय मांजरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. देडे यांनी आभार मानले. 
  सदरच्या कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला