खा. उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची भेट; मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केली मोठी मागणी
ओमकार सोनावणे
- Tue 9th Aug 2022 05:13 am
- बातमी शेयर करा
सातारा : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होत आहे या विस्तारापूर्वी एक दिवस अगोदर साताऱ्याचे राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.. खासदार उदयनराजे भोसले यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे.. उदयनराजे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना समक्ष भेटून निवेदन ही सादर केले आहे.
या निवेदनात मराठा आरक्षण हा जिव्हाळ्याचा विषय आहे, हा प्रलंबित विषय तातडीने मार्गी लागला पाहिजे मराठा, आरक्षणाबाबत घोषणा होतात मात्र प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबतची मागणी केली आहे.
या सरकारमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेल इतर कुठल्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्याकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे हे व्हायला नको, मराठा समाजातील लोक सदन आहेत असे सांगितले जाते मात्र मराठा समाजातील 90% हून अधिक लोक आर्थिक दुर्बल आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असून भविष्यात त्याचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे या निवेदनात म्हटले आहे
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 9th Aug 2022 05:13 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 9th Aug 2022 05:13 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 9th Aug 2022 05:13 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 9th Aug 2022 05:13 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 9th Aug 2022 05:13 am
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Tue 9th Aug 2022 05:13 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 9th Aug 2022 05:13 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Tue 9th Aug 2022 05:13 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Tue 9th Aug 2022 05:13 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Tue 9th Aug 2022 05:13 am
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Tue 9th Aug 2022 05:13 am
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Tue 9th Aug 2022 05:13 am












