खटाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १७७ पैकी १४ अर्ज अपात्र.
आशपाक बागवान
- Thu 6th Apr 2023 03:50 pm
- बातमी शेयर करा
खटाव: खटाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गेल्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये जागृती निर्माण झालेली दिसून आले. सोमवार दिनांक ३ एप्रिल अखेरपर्यंत मतदारसंघात १७७ लोकं व शेतकऱ्यांनी वडूज शेती उत्पन्न बाजार समितीसाठी सुमारे दहा लाख रुपये भरणा व खर्च केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुषमा शिंदे या कामकाज पाहत आहेत.
खटाव तालुक्यातील सोसायटी मतदार संघातील ११ जागांसाठी ७२, ग्रामपंचायत मतदार संघासाठी चार जागांसाठी २२ सर्व साधारण जमाती एक अनुसूचित जाती जमाती जागेसाठी ५ व आर्थिक दुर्बल घटक एक जागेसाठी ९, व्यापारी- आडते दोन जागेसाठी १६, हमाल मापाडी एक जागेसाठी १३, महिला दोन जागेसाठी १३, अशा १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. १७७ एवढ्या विक्रमी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दि. ५ एप्रिल रोजी अर्जाची छाननी झाली त्यावेळी एकुण १४ अर्ज अपात्र ठरले असून दि. ६ एप्रिल रोजी १७७ पैकी १६३ अर्ज पात्र ठरले आहेत. अर्ज भरलेल्या उमेदवारांपैकी सोसायटी मतदार संघातील १) शिंदे अरूण आण्णा, इतर मागासवर्ग,२) करळे राजकुमार पांडुरंग, सर्वसाधारण,३) काळे चंद्रकांत बाळकृष्ण, इतर मागासवर्ग,४) पवार अविनाश पांडुरंग, सर्वसाधारण, ५) तांबोळी उस्मान रमजान, सर्वसाधारण,६) फडतरे कांचन गजानन, महिला राखीव,७) काळे ताई किसन, महिला राखीव,८) जाधव किसन भाऊसो जाधव, सर्वसाधारण,९) जाधव योगेश वसंत, सर्वसाधारण, आणि ग्रामपंचायत मतदारसंघातील
१) कमाने संतोष गणपत, अनु.जाती/जमाती.२) जगदाळे सागर हणमंत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल,३) तांबोळी उस्मान रमजान, आर्थिकदृष्ट्या दुर्बल,४) खाडे अनिल सदाशिव, सर्वसाधारण,५) जाधव रोहन अशोक, सर्वसाधारण,
हे अर्ज अपात्र ठरले आहेत.
२१ एप्रिल रोजी अंतिम यादी त्यानंतर दि. २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.खटाव तालुक्यातील १०३ सोसायटी मधून १२८८,१३३ ग्रामपंचायत मधून ११५४ व व्यापारी- आडते - ८४१, आडते-८४१, हमाल-९६४ मतदार आहेत. त्यासोबतच विक्रमी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कार्यकर्त्यांना संधी मिळाली तर तेवढेच त्याचे नाव होणार आहे. या व्यतिरिक्त हाती काही लागणार नाही. ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. अशी विनंती केली जात आहे. दुसऱ्या बाजूला काही नेतेगण कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्यास भाग पाडत आहेत. ही वस्तुस्थिती पहाण्यास मिळाली आहे. खटाव तालुक्यातील भाजप,स्वाभिमानी शेतकरी संघटना,
शिवसेना, अपक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, काहींनी व्यक्तिगत पातळीवर अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा निधी अधिकृत रित्या झाला आहे. निवडणूक रिंगणात चुरस निर्माण झाली आहे. बिनविरोध निवडणूक होणे गरजेचे आहे. पण, शक्यता कमी आहे. यासाठी प्रबोधन करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी प्रामाणिकपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 6th Apr 2023 03:50 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 6th Apr 2023 03:50 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 6th Apr 2023 03:50 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 6th Apr 2023 03:50 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 6th Apr 2023 03:50 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Thu 6th Apr 2023 03:50 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 6th Apr 2023 03:50 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Thu 6th Apr 2023 03:50 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Thu 6th Apr 2023 03:50 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Thu 6th Apr 2023 03:50 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Thu 6th Apr 2023 03:50 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Thu 6th Apr 2023 03:50 pm












