सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. कुठे आणि त्यांच्या जागी कोण पहा
Satara News Team
- Tue 23rd May 2023 10:47 am
- बातमी शेयर करा
सातारा : महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील सुमारे 119 अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. रात्री उशिरा हे आदेश देण्यात आले असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. साताऱ्यातील कराड, वाई, फलटण, दहिवडी व खंडाळा येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्याठिकाणी नवे पोलीस अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.
१) सातारा ग्रामीण पोलीस अधिकारी गणेश रामचंद्र किंद्रे यांची यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी गजानन टोम्पे हे दाखल होणार आहेत.
२) वाई पोलीस ठाण्याच्या डीवायएसपी शितल जानवे यांची पुणे येथे सुरज गुरव यांच्या जागेवरत अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे.
३) फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी दिलीप बरडे यांची बदली पुणे ग्रामीण (भोर) पोलिस ठाण्यात झाले आहे. तर त्यांच्या जागी पुणे ग्रामीणचे राहुल धस हे कारभार पाहणार आहेत.
४) कराडचे डीवायएसपी डॉ. रणजीत जगन्नाथ पाटील यांची नाशिक ग्रामीण येथील मालेगाव छावणी या ठिकाणी बदली झाली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातून अमोल नारायण ठाकूर हे कराडला होतील.
५) दहिवडी पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अश्विनी रामचंद्र शेडगे या हजर होतील.
६) आप्पासाहेब शेवाळे खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र पोलीस उपाधीक्षक यांची बदली सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर येथे झाले असून प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर त्यांच्या ठिकाणी शशिकांत वाखारे अमरावती यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी दिनेश कदम हजर होतील.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 23rd May 2023 10:47 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 23rd May 2023 10:47 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 23rd May 2023 10:47 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 23rd May 2023 10:47 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 23rd May 2023 10:47 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 23rd May 2023 10:47 am
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 23rd May 2023 10:47 am
-
फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
- Tue 23rd May 2023 10:47 am
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Tue 23rd May 2023 10:47 am
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 23rd May 2023 10:47 am
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Tue 23rd May 2023 10:47 am
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Tue 23rd May 2023 10:47 am
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 23rd May 2023 10:47 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Tue 23rd May 2023 10:47 am











