गुरुवारी { उद्या } पहाटे पूर्व आकाशात अनुभवता येणार शुक्र-मंगळ युतीचा नजारा

सातारा  : आकाशात दरमहा प्रत्येक ग्रहाजवळ चंद्र आल्याने युती स्वरूपात ग्रह दर्शनाचा आनंद आपण घेत असतो, यापेक्षाही अधिक आनंद दोन ग्रह एकत्र बघताना होतो. अशाप्रकारे शुक्र आणि मंगळ ग्रह गुरुवार, २२ फेब्रुवारीला एकमेकांच्या अगदी जवळ येत असून, हा अनोखा नजारा पहाटे पूर्व क्षितिजावर नुसत्या डोळ्यांनी बघता येईल. चंद्र रोज बारा अंश सरकून एका दिवसात एक नक्षत्र आणि एका महिन्यात पूर्ण राशीचक्र फिरताना जेव्हा पुष्य नक्षत्रात येईल आणि जर त्या दिवशी गुरुवार असेल तर गुरुपुष्यामृत योग जुळतो.

याच दिवशी पूर्व आकाशात शुक्र व मंगळ दर्शनाचा अमृत योग घडून येत आहे. आपल्या पृथ्वीला सर्वांत जवळ असलेला आणि सूर्यमालेत सर्वात जास्त तेजस्वी असलेला शुक्र आणि सूर्यमालेत पृथ्वी नंतरचा लालसर रंगाचा मंगळ ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ बघता येतील. यावेळी या दोन्ही ग्रहांचे स्थान मकर राशीत बाराव्या अंशावर पहाटे ५:२१ वाजता उगवतील. दोन ग्रहांच्या एकत्रित आल्याने पूर्व क्षितिजावरील हा अनोखा आकाश नजारा सकाळी सहापर्यंत नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल.

असे आहेत शुक्र, मंगळ
सूर्यमालेत सुंदर म्हणून प्रसिद्ध असलेला शुक्र ग्रह सूर्य आणि पृथ्वी यामध्ये असल्याने याचे उदयास्त पूर्व वा पश्चिम क्षितिजावर होत असतात. मंगळ ग्रहावर लोह खनिज अधिक प्रमाणात असल्याने त्याचा रंग लाल असून आपल्या माउंट एव्हरेस्टपेक्षा सुमारे तीन पट उंच असलेले ऑलिंपस्मोन हे सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत शिखर आहे, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला