कसोटी विवेकाची - पाच दिवसीय प्रदर्शनाने डॉ.दाभोळकर यांना अभिवादन

महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले आहे.
    नरीमन पॉइंट समोर असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सलग पाच दिवस सुरु असलेल्या, "कसोटी विवेकाची" या प्रदर्शनाने डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन करण्यात आले. जिल्ह्याच्यावतीने प्रशांत पोतदार, सौ.हर्षाली प्र.पोतदार, मानस प्र.पोतदार,कोल्हापूरच्या जेष्ठ कार्यकर्त्या सुजाता म्हेत्रे,बेलापूर येथील कार्यकर्ते आनंद किरते आदी कार्यकर्त्यांनी प्रदर्शनास भेट दिली.डॉ.नरेंद्र दाभोळकर विचार व कृती यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून मांडणी केलेलं प्रदर्शन  पाहणाऱ्यानी मनमुराद आनंद लुटला. फ्रेंडस ऑफ दाभोळकर ग्रुपच्या प्रमुख व टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार अलका धुपकर तसेच त्यांच्या टीमने स्वागत केले. संपूर्ण प्रदर्शन व त्या मागची कल्पना यावर बरीच चर्चा झाली. या प्रदर्शनावेळी कल्याण जि. ठाणे येथील जेष्ठ सहकारी अशोक वानखेडे , सौ वानखेडे, राजेंद्र कोळी व बबन नागले यांनीही भेट दिल्याने दुग्धशर्करा योग जुळून आल्याने सातारकरांनी आनंद द्विगुणित झाल्याचे आवर्जुन सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला