'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

सातारा:  दिनांक 23 डिसेंबर करंजे पेठ, सातारा येथील 'शिक्षण प्रसारक संस्था' संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व आदर्श विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांनी सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी आठवडी बाजार हा उपक्रम राबवला. आठवडी बाजाराचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री नंदकिशोर जगताप संस्थेचे कार्यक्षम सचिव श्री तुषार पाटील व चेअर पर्सन सौ प्रतिभा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्थ व पालकांनी बाजारात खरेदी करून मुलांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार समजावेत, शिक्षण आणि व्यवहार यांची सांगड घालावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्था सचिव श्री तुषार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आठवडा बाजाराचे नियोजन केले होते.

      त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध प्रकारची कडधान्य व फळे विक्रीसाठी ठेवले होते. येथे खरेदी करण्यासाठी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. या उपक्रमाचे व विक्री करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी व संस्थाचालकांनी कौतुक केले. उपक्रमास शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष श्री नंदकिशोर जगताप, सचिव श्री तुषार पाटील, चेअर पर्सन सौ प्रतिभा चव्हाण, इतर सर्व संचालक, श्रीपतराव पाटील हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री अमरसिंग वसावे, आदर्श विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ जाधव, सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला