गोडवलीत नरवीर तानाजी मालुसरे शौर्यदिन उत्साहात साजरा

पाचगणी : नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी असणाऱ्या गोडवली (ता. महाबळेश्वर) या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नरवीर तानाजी मालुसरे यांचा शौर्यदिन आणि पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.

गावच्या प्रवेशद्वार सुभेदार चौकात नरवीर तानाजी मालुसरे फलकाचे पूजन करून ' नरवीर तानाजी मालुसरे यांच्या विषयी घोषणा देत ग्रामस्थ मिरवणुकीने ग्रा प कार्यलायासमोर असणाऱ्या सुभेदार स्मारकाजवळ आले. या ठिकाणी विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. या वेळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकस्थळी नरवीर तानाजी मालुसरे संस्था अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंकुश आबा मालुसरे यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.

यावेळी नरवीर तानाजी मालुसरे संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंकुश आबा मालुसरे गोडवलीचे उपसरपंच विष्णू मालुसरे, सदस्य शोभा मालुसरे, तपनेश्वर सेवा मंडळचे दिपक मालुसरे , अजित मालुसरे, अक्षय मालुसरे, आनंद मालुसरे, पोलीस पाटील विशाल पवार, मारुती मालुसरे, सुभाष मालुसरे, सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला