किसन वीर' ची एफआरपीची रक्कम वर्ग

सातारा न्यूज : भुईंज, ता. वाई येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसाची एफआरपीप्रमाणे होणारी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली असल्याची माहिती, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

खंडाळा कारखान्याची एफआरपीची राहिलेली रक्कम या अगोदरच वर्ग करण्यात आलेली होती. सन २०२१-२२ मध्ये किसन वीरकडे गळीताकरिता आलेल्या संपुर्ण ऊसाची एफआरपीची रक्कम येत्या दोन दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या बँकेत जमा करणार असल्याची ग्वाही कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी दिलेली होती. ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांना दिलेल्या शब्दानुसार सन २०२१-२२ मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसाची होणारी सर्व रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. एफआरपीची रक्कम वर्ग झाल्यामुळे ऊस उत्पादक सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आमदार मकरंद आबा पाटील व व्यवस्थापनावर विश्वासार्हता निर्माण झालेली दिसून येत आहे. तरी ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांनी आपला परिपक्तव झालेला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्र. कार्यकारी संचालक अशोक शिंदे व संचालक मंडळाने प्रसिद्धीपत्राद्वारे केले

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला