राज्यातील पहिल्यांदाच साताऱ्यात 3 तृतीय पंथीयांनी पोलीस भरतीसाठी दिली मैदानी चाचणी

राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी देखील अर्ज

सातारा : राज्यात राज्य सरकारच्या वतीने पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी हजारो तरुण-तरुणींनी अर्ज देखील केले आहेत. विशेष म्हणजे प्रथमच तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी देखील अर्ज केले आहेत. यानुसार साताऱ्यात तृतीयपंथीयांची आज पहिली पोलीस भरती पार पडली असून यामध्ये आर्या पुजारी, भूषण शिंदे आणि सतीश पाटील यांची मैदानी चाचणी घेण्यात आली.

सातारा जिल्ह्यात पार पडत असलेल्या पोलीस भरतीसाठी तृतीयपंथीयांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तीन तृतीय पंथीयांची मैदानी चाचणी घेण्यात आली. साताऱ्याच्या आर्या पुजारी यांनी पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांसाठी जागा उपलब्ध करावी यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. त्याला यश मिळाले आहे. साताऱ्यात या तीन जणांच्या भरतीसाठी 70 हून अधिक पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

100 मीटर, 800 मीटर धावणे, गोळा फेक अशी मैदानी चाचणी संबंधित तीन तृतीय पंथीय उमेदवारांची घेण्यात आली. या मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला