साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचं काम बंद पाडलं ?
Satara News Team
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
- बातमी शेयर करा

सातारा : गेल्या महिनाभरापासून गतीने सुरू असलेलं साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचं बांधकाम मंगळवारी बंद पाडण्यात आलं. तसेच ठेकेदारासह कर्मचाऱ्यांनी पलायन केलं असून कोणाची तक्रार नसल्याने प्रशानाही मूग गिळून गप्प आहे. या घटनेची सध्या साताऱ्यात उलटसुलट चर्चा आहे.
काम बंद ठेवायला कार्यकर्त्यांनी भाग पाडले?
साताऱ्यातील कृष्णानगरमध्ये मेडिकल कॉलेजचे बांधकाम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून कॉलेजचं बांधकाम गतीनं सुरु असताना मंगळवारी सकाळी अचानक काम बंद झालं. साताऱ्यातील नेत्याच्या कृष्णानगरमधील स्थानिक समर्थकांनी काम बंद ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना धमकावले असल्याची चर्चा आहे. यामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
ठेकेदारासह मजुरांचं पलायन
काम बंद ठेवून ठेकेदारासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पलायन केलं आहे. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणीही तक्रार केली नव्हती. कॉलेजचे डीन श्री. गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली असून काम बंद असल्याचा रिपोर्ट ठेकेदाराने अद्याप दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मोबाईल बंद ठेवून ठेकेदारही गायब झाला आहे. यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेतंय, याकडे सातारकरांचं लक्ष लागलं आहे.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 20th Mar 2024 01:11 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 20th Mar 2024 01:11 pm